घुले पाटील स्मृती पुरस्कार हणमंतराव गायकवाड यांना जाहिर

नगर – ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार सांस्कृतिक मंडळाच्यावतीने लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्‍तींना देण्यात येणाऱ्या घुले पाटील स्मृती पुरस्कारासाठी ज्येष्ठ उद्योजक हणमंतराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. दि. 15 रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी दिली.
सकाळी 1 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडूरंग अंभग आदी उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे यंदाखे तेरावे वर्ष असून 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षाचा पुरस्कार भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांना देण्यात येणार आहे. जिद्द व मेहनतीच्या जोरावर भारतासह अनेक देशात विविध क्षेत्रात ते कार्यरत असून या ग्रुपच्या माध्यमातून 85 हजारांवर लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, संचालक काकासाहेब नरवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार प्रतिनिधी सुखदेव फुलारी, नागेबाबा मल्टिस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे आदी या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत. कारखान्याच्या सांकृतिक मंडळाने अकाली निधन झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला णक लाखाची मदत केली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कामगाराला 15 हजारांची मदत, असाध्य रोगावरील उपचारासाठी 25 हजारांची मदत, स्त्री जन्म स्वागत उपक्रमांतर्गत मुलींच्या नावाने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असे उपक्रम राबविण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)