घुले पतसंस्थेच्या माध्यमातून गरजूंना आधार देण्याचे काम : मंडलिक महाराज

नेवासा फाटा: घुले पतसंस्थेच्या माध्यमातून गरजूंना आधार देण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्‌गार उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

नेवासा येथील लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेच्या 2019 च्या दिनदर्शिकेचे संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य उद्धव महाराजांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संत तुकाराम महाराज मंदिराच्या सभामंडपात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्धव महाराज मंडलिक होते. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. लोकनेते मारुतराव घुले पतसंस्थेने आत्तापर्यंत सभासदांसाठी घेतलेले हितावह निर्णय, बेरोजगारांसाठी मंजूर केलेल्या कर्जाबाबत व संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी उद्धव महाराजांचा पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील व उपाध्यक्ष महंमदभाई शेख टेलर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महंमदभाई शेख टेलर, संचालक विजय गांधी, डॉ. भाऊसाहेब घुले, नरसू लष्करे, दिलीप जाधव, विकास शेंडे, नगरसेवक लक्ष्मण जगताप, ऍड. बापूसाहेब गायके, फारूकभाई आतार, संदीप बेहळे, जनकल्याण पतसंस्थेचे चेअरमन महेश मापारी, सोसायटीचे चेअरमन दिलीपराव जामदार, अशोक लोखंडे, कचरू गडाख, शंकर ओहोळ, शंभू जंगले, जालिंदर गवळी, शिवा गवळी, दीपक गहिरे, संतोष गायकवाड, पतसंस्थेचे व्यवस्थापक अंकुश धनक, लक्ष्मण नाबदे, ज्ञानेश्‍वर उगले, विशाल जायगुडे, किशोर जाधव, ज्ञानेश्‍वर लोखंडे, जयदीप जामदार, विनायक जाधव, विलास पाटील,दत्तू लष्करे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर विजय गांधी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)