घुलेवाडीत वादाच्या धक्‍क्‍याने एकाचा मृत्यू

संगमनेर – आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादाच्या धक्‍क्‍याने एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात गर्दी केली. खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका काही लोकांनी घेतली.

या संदर्भात खातरजमा केल्यानंतरच आणि वैद्यकीय कागदपत्राच्या आधारेगुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात वादातील एकावर आधी अकस्मात आणि नंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गोरक्षनाथ केशव भालेराव (रा. घुलेवाडी) असे तक्रारदाराचे नाव आहे. केशव बयाजी भालेराव (वय 65, रा. घुलेवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. अर्जुन नाना सातपुते आणि केशव बयाजी भालेराव यांच्यात ट्रक्‍टरच्या पैशाच्या कारणातून सोमवारी सायंकाळी वाद झाला होता. या वादानंतर घरी गेल्यावर काही वेळाने केशव सातपुते यांच्या छातीत वेदना होऊ लागल्यानेत्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु दवाखान्यात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले.

-Ads-

संबधिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांची भेट घेऊन केली. परंतु वैद्यकीय अहवाल आल्याशिवाय अशा प्रकारचा गुन्हा दाखल करता येत नसल्याचेत्यांनी सांगितल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. पोलीस उपाधीक्षक अशोक थोरात यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)