घारेवाडीत 11 जानेवारीपासून बलशाली हृदय संमेलन

नामवंतांची व्याख्याने; तरूणाईसाठी शिवम्‌ प्रतिष्ठानतर्फे सुवर्णसंधी

कराड – राज्यासह परराज्यातील युवक-युवतींचे ऊर्जास्त्रोत बनलेल्या घारेवाडी येथील 18 व्या बलशाली युवा हृदय संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जानेवारी पासून प्रारंभ होत आहे. 13 जानेवारीपर्यंत तीन दिवसाच्या संमेलनात राज्यातील विविध ख्यातनाम वक्तींची व्याख्याने होणार आहेत. संमेलनाला वाढता प्रतिसाद मिळत असून यंदाच्या संमेलनात 4 हजारहून अधिक युवक-युवती सहभागी होतील, असा विश्वास संयोजकानी व्यक्त केला आहे.

घारेवाडी (ता. कराड) येथील शिवम्‌ आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बलशाली युवा हृदय संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 18 वे वर्ष आहे. यावर्षी तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले आहे. पुणे येथील मेटल इंडस्ट्रीअल कंपनीचे एमडी प्रकाश धोका यांच्या हस्ते उद्‌घाटनाने संमेलनाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होणार आहे. जॉय ऑफ गिविंग या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर विवेक वेलणकर यांचे माहिती अधिकार कायदा या विषयावर व्याख्यान होईल.

तिसऱ्या सत्रात मरावे परि अवयव रूपी ऊरावे या विषयावर सातारा येथील कोमल न्यू लाईफ फौंडेशनच्या संस्थापिका कोमल पवार-गोडसे यांच्या व्याख्यानानंतर अधिकराव कदम यांच्या हिमालयावर येता घाला या व्याख्यानाने पहिल्या दिवसाची सांगता होईल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्‌ होल्डर विराग वानखेडे यांच्या असा मी असामी या विषयावर व्याख्यानाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होणार आहे.

यावेळी शेती उद्योजक अशोक इंगवले यांचे सेंद्रीय शेती या विषयावर व्याख्यान होईल. दुसऱ्या सत्रात विवेक सावंत यांचे कृत्रिम बुध्दीमत्ता व उद्याचे शिक्षण या विषयावर व्याख्यान होईल. दीपस्तंभचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांच्या चांगला माणूस घडविण्यासाठी तर रामदासजी माने यांचे असा घडतो उद्योजक या विषयावर व्याख्यान होईल. देशभक्तीपर जागो हिंदुस्थानी कार्यक्रमाने त्या दिवसाची सांगता होईल. रविवारी अभिराम प्रभूंच्या ईस्कॉन नाम संकिर्तनाने पहिल्या सत्राला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर नाम फौंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांचे शेतकऱ्यांच्या व्यथा या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाने समारोप होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)