घारगाव येथे तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका तरुणाने आपल्या राहत्या घराच्या आडोशाला दोरीच्या साहय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी २९ एप्रिल रोजी दुपारी घडली. अनिल आण्णा बरडे (वय-२५) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मुळा नदीच्या कडेला बरडे हा तरूण कुटुंबासह राहात होता. रविवारी दुपारी त्याचा भाऊ राजू याने घर उघडले असता तर समोर त्याला अनिल याचा मृतदेह दिसला. घाबरून त्याने जोराने आरडाओरड सुरु केली. आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. अनिल याचा मृतदेह खाली घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी राजू बरडे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय विखे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)