घारगाव पोलीस ठाण्यातील डायरी हद्दपार

संगमनेर: पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद ठेवण्यासाठी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे ब्रम्हास्त्र असलेली स्टेशन डायरी आता घारगाव पोलीस ठाण्यातून हद्दपार झाली आहे. ठाणे अमलदारांच्या टेबलावर असलेली ही स्टेशन डायरी भल्याभल्यांच्या उरात धडकी भरवत होती. एखाद्या गुन्ह्यात कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास, चतूर पोलीस कर्मचारी त्याची नोंद या डायरीत करीत असे. या डायरीमुळे अनेक राजकीय नेते अडचणीत आले, तर काहींचे राजकीय करिअर उध्वस्त झाले आहे.

घारगाव पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीमध्ये नोंद न करता नवीन संगणक प्रणालीत गुन्ह्यांची नोंद घेण्यास 1 जानेवारीपासून सुरवात झाली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये पोलीस विभागही मागे नाही. पोलीस विभागानेही कात टाकत विविध कामे आता संगणकीय केली आहेत. एकमेव स्टेशन डायरी पोलीस स्थापना दिवसापासून ते आजपर्यंत खाकीसोबत होती. आता ही डायरीदेखील पोलिसांना सोडून गेली असल्याने, या डायरीच्या माध्यमातून अनेक आठवणी पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगीतल्या. या डायरीची जागा आता सीसीटीएनएस या संगणक प्रणालीने घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता सर्व गुन्ह्यांची नोंद ऑनलाइन केली जात आहे. पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारींना आळा बसणार आहे. तसेच एकदा सीसीटीएनएस प्रणालीवर तक्रार दाखल झाल्यास ती तक्रार किंवा एफआयआर राज्यातील पोलीस महासंचालक, सीआयडी आणि सबंधित न्यायालयाला मिळणार आहे. त्यामुळे तक्रारदाराचा वेळ वाचणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)