घारगावात चार दुकाने फोडली

संगमनेर – तालुक्‍यातील घारगाव बसस्थानक परिसरातील चार दुकाने फोडून चोरट्यांनी शनिवारी रात्री 54 हजार रुपयेकिमतीचा मुद्देमाल लांबवला.
छत्रपती संकुलामधील रिजवान इस्माइल शेख यांच्या फॅशनोरा कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 25 हजार किमतीचेटीशर्ट, 27 हजार किमतीचेइतर कपडे आणि 2 हजार रुपये रोख असा 54 हजारांचा मुद्देमाल लांबवला.
जवळच असलेल्या टाकळी ढोकेश्‍वर पतसंस्थेचे शटर उचकटत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर चोरट्यांनी शेजारीच असलेले दिलीप थोरात यांचे किराणा दुकान आणि सुरेश आहेर यांचे प्रियंका मेडिकलचे शटर उचकटत गल्ल्यामधील चिल्लर नेली. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचेनिरीक्षक दिलीप निघोट, उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी घटनास्थळी पाहणी केली. टाकळी ढोकेश्‍वर पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल कडनर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनात हवालदार संजय विखेतपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
4 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
10 :cry: Sad
8 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)