घारगावच्या आश्रमशाळेला श्रीगोंदेकरांचा मदतीचा हात

श्रीगोंदा – घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक आश्रमशाळेस श्रीगोंदेकरांनी मदतीचा हात देत 16 हजार रुपये रोख व तीन ब्रास फरशी मदत म्हणून भेट दिली. अनाथांसाठी एका तासात गोळा झालेल्या या मदतीमुळे आश्रमशाळेचे पोपटराव खामकर भारावून गेले.

घारगाव येथे 120 अनाथ मुलांचा सांभाळ खामकर करीत आहे. खामकर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालवत असलेल्या आश्रमशाळेबद्दल श्रीगोंद्यातील काही नागरिकांना माहिती मिळाली. बापूसाहेब गोरे, माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे, आदींनी या शाळेस भेट देऊन पाहणी केली अन्‌ मदतीसाठी हात पुढे येऊ लागले. गोरे, कोथिंबिरे यांसह नाना लांडे, कांतीलाल आमले, गणेश श्रीराम, नंदकुमार लाढाणे, दीपक शिंदे, सचिन दहातोंडे, वसीम पठाण, संजय ढवाण, नानासाहेब खेतमाळीस, आदिक, वांगणे, संदीप भोळे, प्रितम भंडारी, सीताराम चौधरी, आदींच्या मदतीतून 16 हजार रुपये रोख व तीन ब्रास फरशी शाळेत जाऊन खामकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या मदतीबद्दल खामकर यांनी सर्वांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)