घाणीमुळे दत्तनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

पिंपरी – चिंचवड येथील दत्तनगरमध्ये गटर, नाले, चेंबर दुरूस्तीची कामे निघाल्यामुळे ऐन पावसाळ्यातच नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कामे तातडीने करून घ्यावीत, अशी मागणी सुजाण नागरीक संघाने केली आहे.

यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये संघाचे अध्यक्ष सुंदर कांबळे यांनी म्हटले आहे की, चिंचवड येथील दत्तनगरमध्ये गेली कित्येक माहिने घाणीचे साम्राज्य आहे. नाले तुटल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच, नाल्यामध्ये कचरा साचल्यामुळे घाण पाणी तुंबून दुर्गंधी पसरली आहे. त्यातच चेंबर जाम झाल्यामुळे वाहते घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्याचा आजुबाजूच्या नागरिकांना त्रास होत आहे. दुर्गंधीमुळे परिसरात मच्छरांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देऊन दुरूस्तीची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)