घाट रस्त्यांवरही होणार ई-बसची “ट्रायल’

पुणे – पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीसाठी शहरात दाखल झालेल्या इलेक्‍ट्रिक बसची विविध मार्गांवर “ट्रायल’ सुरू आहे. ई-बसची क्षमता तपासण्यासाठी गर्दी तसेच अरुंद रस्त्यांवरदेखील ही “ट्रायल’ घेण्यात येत असून आता घाट परिसरातील चढावर ही “ट्रायल’ घेतली जाणार आहे. शहरालगतच्या कात्रज किंवा दिवे घाट यातील एका ठिकाणी ही चाचणी होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी म्हटले आहे.

पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली इलेक्‍ट्रिक बस अखेर बुधवारी शहरात दाखल झाली. बीवायडी (ओलेक्‍ट्रो) कंपनीची 9 मीटर लांबीची नॉन बीआरटी ही बस आहे. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर शहरातील विविध मार्गावर या बसची “ट्रायल’ घेण्यात येत आहे. यादरम्यान “सीआयआरटी’ आणि पीएमपी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून बसचा “परफॉर्मन्स’ तपासणे सुरू आहे. यासाठी बसमध्ये 3 हजार किलो वजनाचे पोते टाकून ही “ट्रायल’ सुरू आहे. तसेच, इतर बसेसप्रमाणे ट्रायलदरम्यान ठिकठिकाणी बसस्थानकावर गाडीचे दरवाजे उघड-बंद केले जात आहे. अशा प्रकारे बसची तपासणी करण्यात येत असून आता घाट परिसरात चाचणी घेण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत कात्रज किंवा दिवे घाटात ही चाचणी होणार असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान साधारण रस्त्यांवर आणि घाट परिसरात काही फरक पडतो आहे का, याची पाहणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 500 वातानुकूलित ई-बस भाडेकराराने घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्यानुसार साधारण दोन महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. वातानुकूलित ई-बसमध्ये पहिल्या टप्प्यात 150 आणि दुसऱ्या टप्प्यात 350 बसेस घेण्याचे नियोजन आहे. या बस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्‍ट बेसिस (जीसीसी) या तत्त्वावर घेण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)