घाटकोपर बॉम्बस्फोटाचा आरोपी 16 वर्षांनी औरंगाबादमध्ये जेरबंद

औरंगाबाद – मुंबईतील घाटकोपर इथे 2002 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपीला औरंगाबादमध्ये जेरबंद करण्यात आले आहे. तब्बल 16 वर्षांनंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुजरात एटीएस पथकाने स्थानिक एटीएसच्या सहाय्याने ही कारवाई केली. अब्दुल रहमान खान असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी अब्दुल रहमान शेख त्याच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी 5 ऑगस्टला औरंगाबादमध्ये आला होता. त्याच्या पत्नीवर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनंतर एटीएस पथकाने औरंगाबादच्या कैसर कॉलनीत सापळा रचून अब्दुल रहमान शेखला बेड्या ठोकल्या.

-Ads-

गुजरात एटीएस पथक औरंगाबादमध्ये काही प्रकरणांचा तपास करत आहे. याप्रकरणी अब्दुल रहमान शेखला संशयाने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने घाटकोपर स्फोटात सामील असल्याची कबुली दिली. गुजरातमधील कुठल्याही प्रकरणाशी त्याचा संबंध नसल्याने त्याला महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवले, असे एटीएसच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
अब्दुल शेखचे वय 43 वर्ष आहे. तो 2002 पासून सौदी अरेबियात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. गुजरात एटीएसचे पथक त्याला मुंबई क्राईम ब्रान्चच्या ताब्यात देणार आहे.

दरम्यान, घाटकोपरमध्ये 2 डिसेंबर 2002 रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बेस्ट डेपोमधील एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 2 नागरिक ठार, तर 50 जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटमुळे बेस्टसह सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास 5 लाख 33 हजार रुपयांचे नुकसान झाले होते.

इरफान कुरेशीची पुराव्याअभावी सुटका
घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणाच्या आतापर्यंत खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे. यावर्षी मे महिन्यात औरंगाबादहून इरफान कुरेशीला मुंबई क्राइम ब्रॅंचने अटक केले होते. मात्र, त्याच्याविरोधात पुरेशी पुरावे नसल्याच्या कारणास्तव त्याला नुकतेच सोडून देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)