घाऊक महागाईत घट 

नवी दिल्ली: पावसाचा सकारात्मक परिणाम अन्नधान्याच्या किमतीवर होत असतांना दिसत आहे. फळे आणि भाजीपाला आता स्वस्त होऊ लागला आहे. त्यामुळे घाऊक महागाईत नरमाही येण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी जुलै महिन्यात घाऊक महागाईा दर कमी होऊन तो आता 5.09 टक्‍क्‍यांवर आला आहे. जून महिन्यात या महागाईचा दर तब्बल 5.77 टक्‍क्‍यांवर गेला होता. सरकार आणि बॅंकेने महागाईचा दर 4 टक्‍क्‍याच्या आता रोखण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.
या महागाईचा दर आरखीही जास्त आहे. महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने या वर्षात आतापर्यंत दोन वेळा व्याजदरात वाढ केली आहे. मात्र या अगोदर व्याजदर वाढ करतांना रिझर्व्ह बॅंकेने आगामी काळात महागाई कमी होण्याची शक्‍यता असल्यामुळे पुन्हा व्याजदर वाढ करण्याची गरज पडणार नाही असे सूचित केले आहे. त्यामुळे शेअर बाजारात तेजीला चांगला हातभार लाग असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात या महागाईचा दर केवळ 1.88 टक्‍के इतका मोजला गेला होता. आता जुलै महिन्यात कृषी उत्पादनाचे दर वाढण्याऐवजी 2,16 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. भाजीपाल्याचे दर 14.07 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. तर फळांचे दर 8.81 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. या दोन वस्तूूचे दर वाढत असल्यामुळे या अगोदर महागाई वाढत होती. आता ती महागाई कमी होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जुलै महिन्यात डाळींचे दर 17 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)