घाई करा…घर खरेदीची सुवर्ण संधी आताच

नवी दिल्ली : जर तुम्हाला घर घ्यायचे आहे आणि किंमती स्वस्त होण्याचा विचार करत असाल, तर ही मातमी तुमच्यासाठी आहे. जेएलएल या आघाडीच्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशात प्रमुख ७ शहरांत अजूनही साडेचार लाख घरं विक्री होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यात सर्वाधिक मोठा आकडा दिल्ली-एनसीआरमध्ये आहे.

जेएलएल दिलेल्या माहितीनुसार, देशात सुमारे ४ लाख ४० हजार फ्लॅट अजूनही विक्रीविना आहेत. तर दिल्ली-एनसीआरमध्ये सुमारे दीड लाख फ्लॅट रिकामे आहेत. दिल्लीसोबतच चेन्नई, हैदराबाद, पुणे, बंगळूरू, कोलकाता आणि मुंबईत हजारो फ्लॅट ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्रासारख्या राज्यात लागू करण्यात आलेला रेरा कायदा शिवाय नोटाबंदी, जीएसटी यामुळे गेल्या काही दिवसांत रियल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)