घर सोडून जाताना…

आपले घर सोडता येणार नाही, असा अनेकांचा प्रयत्न असतो. परंतु काहीवेळा नाइलाजाने घर सोडून जावे लागते. गेल्या काही वर्षांत महानगरातील लुटमारीच्या आणि चोरीच्या वाढलेल्या घटना पाहता घराला कुलूप लावून जाताना अनेकांना काळजी वाटते. पूर्वी कुटुंबाचा आकार मोठा होता आणि घरात राहणारी मंडळी खूप होती. आता विभक्त कुटुंबामुळे आणि दोघेही नोकरी करत असल्याने घरात राहणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी सुरक्षेबाबत सर्व दक्षता घेऊनही मालक घराबाबत चिंतेत असतो. नोकरीमुळे दोघांना दिवसभर घराबाहेर राहवे लागते. तसेच काही वेळा रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. अशावेळी घराची सुरक्षा अतिशय महत्त्वाची बाब ठरत आहे. सीसीटीव्ही, चौकीदार, सेफ्टी डोअर आदींच्या मदतीने घर सुरक्षित ठेवता येते, परंतु आणखी काही गोष्टी आपल्या घराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या ठरतात. काही पथ्य पाळल्यास आपले घर अधिक सुरक्षित राहू शकते.

प्रकाश राहू द्यावा
चोरीची संपूर्ण शक्‍यता राहणार नाही अशी काळजी घरमालकाने घ्यायला हवी. त्यामुळे घराबाहेर पडताना घराची अशी व्यवस्था करावी की, चोर घराजवळ फिरकणारही नाहीत. यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात उजेड ठेवणे. जर सायंकाळच्या वेळी घरात दिवे चालू ठेवले तर त्याचे दोन-तीन फायदे होतात. चोर अंधाराचा फायदा घेऊन घरात प्रवेश करू शकणार नाहीत आणि दुसरे म्हणजे अनेकांना वाटेल की, घरात कोणीतरी आहे. अशा स्थितीत चोर घरात घुसण्याचे धाडसच दाखवणार नाहीत. अर्थात दिवसभर दिवे सुरू राहिल्याने वीजबिल वाढू शकते, अशावेळी स्मार्ट दिव्यांचा वापर करावा. टायमरचा वापर करून सायंकाळी पाचनंतर दिवे आपोआप सुरू होतील, अशी व्यवस्था करावी. सध्या मोशन सेन्सर देखील बाजारात उपलब्ध आहेत. जे की एखादा व्यक्ती घराजवळ येताच घरातील दिवे आपोआप सुरू होतात. यामुळे शेजारी देखील सजग राहतील.

– विनायक सरदेसाई


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)