घर विक्रीत झाली 40 टक्‍क्‍यांची घट

  2013-14 पासून एकतर्फी परिस्थिती बिघडत गेली

नवी दिल्ली -2013-14 च्या तुलनेत 2017 मध्ये घरांच्या विक्रीत 40 टक्‍क्‍यांची घट झाली असल्याचा दावा ऍनारॉक या संस्थेने केला आहे. 2017 मध्ये केवळ 202800 घरांची विक्री झाली आहे. या क्षेत्रात दिल्ली आणि परिसरात सर्वात जास्त मंदी निर्माण झाली आहे.

या संस्थेने गेल्या पाच वर्षात सात शहरातील विक्रीची आकडेवारी जमा केली आहे. त्यात दिल्ली, पुणे, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळूरुचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षाचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की, 2013- 14 या काळात रिऍल्टीसाठी परिस्थिती खरोखरच चांगली होती. नंतर अनेक कारणामुळे रिऍल्टी क्षेत्रासमोरचे प्रश्‍न वाढत गेले आणि त्याचा विक्रीवर परिणाम झाल्याचे ऍनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.

ते म्हणाले की, 2013 व 14 मध्ये साधारणपणे प्रत्येक वर्षाला 3.3 लाख घरे विकली जात होती. मात्र 2015-16 या काळात केवळ 2.7 लाख घरे विकली गेली. विक्रीत 17 टक्‍क्‍यांची घट झाली. नंतर 2017 मध्ये तर या सात शहरात केवळ 202800 घरे विकली गेली आहेत. म्हणजे 2013-14 ते 2017 या काळात घरांची विक्री तब्बल 40 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे दिसून येते. मुंबई आणि दिल्लीत गुंतवणुकीसाठीच्या घरांची संख्या जास्त असते. दिल्लीतील विक्रीत 68 टक्‍के तर मुंबईतील विक्रीत 27 टक्‍के इतकी घट झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ लोकांकडील पैसाच कमी झाल्याचे दिसून येते. दिल्लीत 2313-14 मध्ये 116250 घरे विकली गेली होती. आता हे प्रमाण केवळ 37600 घरापर्यंत कमी झाले आहे.

बंगळूरू आणि चेन्नईत गुंतवणूक म्हणून घरे खरेदी करण्याचा प्रकार वाढला आहे. मात्र बंगळूरुत या काळात घरांची विक्री 17 टक्‍क्‍यांनी तर चेन्नईत 45 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. पुण्यातही अनिवासी भारतीयांकडून आणि इतरांकडून   गुंतवणुकीसाठी घरे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. या शहरातील घर विक्रीही 29 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
फक्‍त राहण्यासाठी घरे घेण्याचे प्रमाण जास्त असलेल्या कोलकाता या शहरात घरांची विक्री 12 टक्‍क्‍यानी कमी झाली आहे. हैदराबादेतील घर विक्रीलाही 32 टक्‍क्‍यांचा फटका बसला असल्याचे आढळून आले आहे. पुरी यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांकडून या क्षेत्राला मिळणारी प्राथमिकता कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर या काळात नोटाबंदी आणि रेराची अंमलबजावणी या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे या क्षेत्रातील अनिश्‍चितता कमी होण्याची शक्‍यता आहे. आगामी काळात या क्षेत्रातील सट्टेबाज कमी होतील, असे त्यांनी सांगितले. मात्र हे क्षेत्र पूर्वपादावर कधी येईल हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)