घर खरेदी झाली सोपी

सध्याच्या आकडेवारीनुसार देशभरात घर खरेदीवर होणाऱ्या खर्चात घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळात घर खरेदीला लागणारा वेळ आता तुलनेने कमी झाला आहे. घराच्या घसरत्या किमती आणि वाढते उत्पन्न या कारणामुळे घर खरेदी ही पूर्वीच्या तुलनेत अधिक सुलभ आणि सोपी झाली आहे. घरांची मुबलक उपलब्धता आणि कोटीचे पॅकेजमुळे घराचे स्वप्न लवकर साकारताना दिसून येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, घर खरेदीचा हा उत्तम काळ आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अंदाजानुसार बहुतांश शहरात घर खरेदी करणे सोपे झाले आहे. कारण 2018-19 मध्ये मालमत्तेची किंमत कमी होऊन ती कुटुंबांच्या उत्पन्नाच्या 6 ते 8 टक्‍क्‍यांवर आली आहे. पाच वर्षांपूर्वी हा खर्च 11 ते 13 पट होता. या स्थितीलाच अफोर्डिबिलिटी असे म्हटले जाते. अफोर्डिबिलिटीचा अर्थ असा की किती वर्षाच्या वार्षिक उत्पन्नातून घर खरेदी करता येते, याचा अंदाज बांधणे होय. उदा एखादी मालमत्ता 25 लाखांची असेल आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 10 लाख असेल तर अडीच वर्षात घर खरेदीची क्षमता संबंधित कुटुंबाकडे येते. यालाच अर्फोडिबिलिटी म्हणतात. मालमत्तेची किंमत ही कौटुंबिक वार्षिक उत्पन्नावर आधारित असते. क्रिसिलच्या मते, अफोर्डिबिलटी ही आदर्श स्थितीत येण्याच्या तयारीत आहे. अर्थात हा अंदाज मध्यम उत्पन्न घटातील कुटुंबांचे उत्पन्नाच्या अंदाजित वाढीवर बांधला आहे. यामागचे आणखी एक कारण म्हणजे बिल्डर हे बाजारातील गरजेनुसार घराची रचना करत आहेत. अर्थात रेसिडेन्शियल सेक्‍टरमध्ये गुंतवणुकीच्या मूल्याचा दबाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लहान बाजारात गुंतवणुकीचे मूल्य 5 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले आहे. असे असले तरी मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांची कहानी वेगळी आहे. सुमारे 14 लाखांचे उत्पन्न असणाऱ्या या गटातील ग्राहकांचा अफोर्डिबिलिटीचा फॅक्‍टर घसरून 3.7 वर्षाच्या नीचांकी पातळीवर आला आहे. याचाच अर्थ असा की, चौदा लाखांचे वार्षिक उत्पन्न घेणारा व्यक्ती किंवा कुटुंब आपल्या 3.7 वर्षाच्या उत्पन्नातून घर खरेदी करू शकतो.

1995 मध्ये अफोर्डिबिलिटी फॅक्‍टर 22 होता. तत्कालिन काळात वार्षिक 1.20 लाख उत्पन्न घेणारे मध्यमवर्गीयातील कुटुंबांना एमआयजी फ्लॅट खरेदी करण्यासाठी 22 वर्षांचे वेतन मिळवणे गरजेचे होते. यासाठी फ्लॅटची किंमत सुमारे 26 लाख गृहित धरली आहे. आता एमआयजीची किंमत दुप्पट होऊन ती 50 लाख झाली आहे. घराची किंमत वाढली असली तरी या गटातील कुटुंबाचे उत्पन्न हे वार्षिक चौदा लाखांपर्यंत पोचले आहे. घरांच्या उपलब्धतेमुळे अफोर्डिबिलिटी फॅक्‍टर घसरला आहे. एमआयजी सेगमेंटमध्ये घराची उपलब्धता वाढली आहे.

– अंजली महाजन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)