घर खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारने दिली गूडन्यूज

नवी दिल्ली : तुम्हीही घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना व्याज सबसिडी (सूट) मिळण्यास सुरुवात झाली आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा या परिसरात घर खरेदी करणाऱ्या मध्यमवर्गीय आणि अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत या नागरिकांना गृह कर्जावर जवळपास अडीच लाख रुपयांची व्याज सबसिडी मिळणार आहे.

उत्तर प्रदेश सरकाने या दोन शहरांची नावे गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाकडे पाठवली. सरकारनेही या यादीवर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे या शहरांत घर खरेदी करणाऱ्यांना व्याज सूट मिळणार आहे. घर खरेदी करणाऱ्यांमध्ये ज्यांचं उत्पन्न १८ लाख रुपयांपर्यंत आहे आणि ज्यांनी जानेवारी २०१७ नंतर घर खरेदी केले आहे अशा नागरिकांना सबसिडी मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) योजनेअंतर्गत लवकरच या नागरिकांना जवळपास अडीच लाख रुपयांची व्याज सबसिडी मिळणार आहे.

गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने PMAYच्या या योजने संदर्भात काही बदल करत १५ मार्च रोजी नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं होतं. १ जानेवारी २०१७ पासून मध्यम वर्गासाठी नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरासोबतच इतरही शहर सबसिडी स्किम अंतर्गत आणण्यात येणार आहेत. यासोबतच नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी) आणि हाऊसिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको) कडे पाठवण्यात आलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)