घर के ‘शेर’ ऑस्ट्रेलियाकडून ‘ढेर’ 

सामन्यासह भारताने मालिका गमावली 

दिल्ली : भारताने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मालिकेतील शेवटचा सामना गमावत ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका गमावली. सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकणारा भारतीय संघ नंतरच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळू न शकल्याने भारताला आपल्या घरच्या मैदानावरच हार पत्करावी लागली आहे.

आजच्या सामन्यामध्ये पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फसत असतानाच ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज उस्मान ख्वाजा याने आपले वैयक्तिक शतक पूर्ण करत संघाला 272 या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोलाची मदत केली.

विजयासाठी 273 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात देखील पडझडीचीच राहिली. गेल्या सामन्यामध्ये दमदार शतक ठोकणारा शिखर धवण आजच्या निर्णायक सामन्यामध्ये मात्र अपयशी ठरला. भारतातर्फे रोहित शर्माने सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. सामन्याच्या शेवटच्या काही षटकांमध्ये केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र भुवनेश्वर आणि केदार जाधव हे एकापाठोपाठ एक बाद झाल्याने भारतीय संघाच्या विजयाच्या सर्व अपेक्षा मावळल्या. भारताचा डाव निर्धारित ५० षटकांमध्ये ९ गाड्यांच्या मोबदल्यात २३७ धावांवर आटोपल्याने भारताला ३५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)