घर एक तीर्थस्थान…

मानवी मनाच्या अनेक पैलूचे विश्‍लेषण करताना त्याच्या मनातील भावना, विचार मग त्या प्रत्येक भावना, विचारांमागील दोन्ही बाजू पडताळू पाहताना माणूस म्हणजे काय तर नुसता एक देह कि जो नरवर आहे? तर नाही! त्या देहान सुप्त अशी एक शक्ती आहे तिच्या आज्ञेवरच देहातील आत्म्याचे मनाचे त्यात तयार होणाऱ्या भाव-भावनांचे प्रतिबिंब पडते ह्या सर्व पैलूचा विचार करताना स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एका विशिष्ट आधाराची गरज लागते ते म्हणजे “घर’

“”घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम, जिव्हाळा नकोत नुसती नाती” ह्या ओळी प्रत्येकाच्याच कानावर पडतात मग खरच काय असेल घर चार भिंती- दोन दार दोन खिडक्‍या? माणसाला घराची गरज का लागते? घर एक मंदीर, असेही म्हणतात. ठराविक कुलात आपला जन्म होवून आपल्याला एक घर मिळते.

अंगण
“घराचे’ अंगण म्हणजे घराचा आरसा दारात छानसी रांगोळी, तुळशी वृंदावन, एखादी छानसे फुलाचे झाड, ते प्राजक्ताचे असेल तर जास्त छान कारण सुगंधाशिवायही मनाला मोहकना देणारे ते एक कोमल फूल मनाला आनंद देते. दरवाजा वरील गणपतीचे चित्र नकळत घरात शिरतानाच नतमस्तक होवून, अहंम बाजूला ठेवून घरात शिरा हा संकेत देणे दरवाजावरील नामावली घरातील व्यक्तींची प्रथम ओळख करुन देते नावावरुन कसलाही अंदाज येत नसला तरी आडनाव नामावलीनुसार व्यक्तींचा अंदाज घेता येतो. नतमस्तक झाल्यावर आत शिरताना ओलांडावा लागतो तो घराचा

“उंबरठा’

“उंबरठा’ मर्यादेच प्रतिक मानला गेला तर घरात आणि घराबाहेर घरात राहणाऱ्या व्यक्तीचे वर्तन मर्यादाशीलच असावे हेच दर्शवत असेल. उंबरठा ओलांडून आत गेल्यावर घराचे विस्तृत दर्शन होते. घरात निर्माण होणारी स्पंदन प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जातात. सधनता असणे घरात उंची समान असणे एवढ्यावरच घराचा दर्जा, घरातील लोकांचे राहणीमान ठरेल ही कदाचित पण खरी सधनता मनाची विचाराची असेल तर त्यातून निर्माण होणारी स्पंदने घरातील सधनतेला सतेज बनवतील.

दिवाणखाना 

दिवाणखाना हे घराचे पहिले मुख असेही म्हणता येईल. ज्यामध्ये बसून असंख्य विचारांचे आदान प्रदान होईल. अनेक विचारांची माणसे येवून घरातील विविध गोष्टींचा अभ्यास करुन व्यक्तीनुसार आपले मत बनवतील आयुष्यातल्या प्रत्येक कटू गोड आठवणींची रुजवान करायला लावणारा हा दिवाणखाना पुढील अनेक आयुष्यातल्या टप्प्यांचा साक्षीदार ठरेल तेव्हा त्यान कायम सकारात्मक स्पंदनेच निर्माण होतील ही व्यक्ती आग्रहता आहेच.

स्वयंपाकघर

सात्विक विचार सात्विक अन्नामुळे तयार होतात कारण मनुष्यदेह अन्नपिंडमय आहे ज्या प्रकारचे अन्न तुम्ही ग्रहण करता तेच विचार व्यक्तीच्या मनात व्युप्त होतात आहार हा सात्विक असावा घरचा असावा असे ठासून आपण म्हणतो मग अशा सात्विकतेचे मुख्य स्थान म्हणजे घराचे “स्वयंपाकघर’ घणाचा आत्मा जिथे असंख्य गोष्टी घडतात, आईचे हक्काचे स्थान कधी कडू, तर कधी गोड, तिखट आंबट रसांचा स्वाद आपल्या आहारात उत्पन्न करणारे एक पवित्र स्थान, जिथे बसून आपण भोजनाचा आस्वाद घेतोच पण मनातील दिवसभर साचलेल्या भावनांना व्यतित केलेल्या दिनचर्येची चर्चा करतो त्यातून काही चुका तर काही गुण यांचे स्वत:चेच परीक्षण करता येते. कारण तिथेच फक्त विश्‍वास प्रेम, देणारी भावना व्यक्त होते.घराच्या अंगणावरुन जसे आपण घराचे चित्र मनात तयार करु शकतो तसेच घराच्या ईशान्य कोपऱ्यात वसणारे आपले “देवघर’ ही घराची घरातील व्यक्तींची ओळख नकळत देते, आयुष्यात घडणाऱ्या सर्व सुख-दुखाची रुजवात होते ती या देवघरासमोर मन पुन्हा नतमस्तक होत. ““हे विश्‍वची माझे घर, ऐसी मनि जयाची स्थिर!”ही संत ज्ञानेश्‍वरांची ओवी किती अनुभवनीय आनंददायी आहे. ज्याला सारे जग आपले घर वाटते, जो मी म्हणून उरत नाही सर्व चराचर होवून जातो तो या “घर’ संकल्पनेतूनच “मी’ स्वत: पुरता मर्यादित न राहता विश्‍वाएवढा विशाल होण्याचा विचार देते ते “घर’ जशी मीठाने भरलेली पोती सागरात परत पडली तर ती विरघळून जातील तसेच “घर’ स्वत:पुरते न राहता विश्‍वरुप होण्याचे संकेत देते, मग विश्‍वची माझे घर वाटेल “स्व’ ला विसरुन राहता आले तर ? जे केवळ व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून राहते. आयुष्याच्या प्रवासात प्राप्त प्रतिकुल परिस्थितीत आपले सामर्थ्य टिकून राहते. कौटुंबिक प्रेम मिळणे आपल्या अंगच्या चांगल्या गुणांचे कौतुक होते ते या घरामुळेच कारण याच घरात माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे संपत्ती, परस्परांविषयी प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, आपुलकी असते आणि त्यामुळेच घराचे घरपण सांभाळता येते, घरातील वातावरण आनंदी होते. मात्र ज्यामुळे घर आनंदी होईल असेच परस्परांचे परस्परांशी वागणे बोलणे हवे, पैसा स्वकष्टार्जित असला पाहिजे, संपत्ती दान असावे म्हणजे पुण्य मिळते असे म्हणतात ही संकल्पना रुजते ती घरामुळेच प्रेम द्यावे, प्रेम करावे, अशीच संकल्पना रुजवणारे मन तयार होते ते घरामुळेच. ज्ञान, माया, ममता, सयंम, त्याग, सदाचार, समाधान हे खरे कृतार्थ जीवन जे घडते केवळ “घर’ या बैठकीमुळेच. “घर’ म्हणजे खऱ्या अर्थाने भौतिक शारिरीक मानसिक गरजा पुरवणारे हक्काचे ठिकाण जे भूतकाळ भविष्यकाळाचे संचित घेवून वर्तमान सुखकारक करणारे एक आधारकेंद्र बनते असे ही म्हणता येईल. आपल्या प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टींचे कृतींचे ते खऱ्या अर्थाने साक्षीदार ठरते, “घर’ एक सुखद ओलावा, मायेची ऊब, थकल्यानंतरचा एक विसावा मायेची फुंकर घालून मनाची रुजवात करुन दिलासा देणारे एक सोनेरी पिंपळपानच जणू जटिल धागेदोऱ्यांनी विणलेली नाती तरी ही सपाट नितळ जगण्याला एकसंघता आणते ते “घर’ नुसते निवासस्थान नसून खरे तीर्थस्थानच म्हणता येईल.

मधुरा धायगुडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)