घर आणि मन प्रसन्न राहण्यासाठी झाडे, फुले लावा – सुरेखा जाधव

लोणावळा – आपल्या घर व परिसरात झाडे आणि फुलांची लागवड करत त्यांचे उत्तमप्रकारे संगोपन करून परिसर स्वच्छ ठेवा. झाडे आणि फुलांमुळे आपले घर, परिसर याबरोबर आपले मन प्रसन्न होऊन आरोग्य सुधारते. यासाठी प्रत्येकाने झाडे व फुलांची लागवड करण्याची नितांत गरज आहे, असे मत लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्‍त केले.

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शनाच्या उद्‌घाटन प्रसंगी सुरेखा जाधव बोलत होत्या. या वेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरोग्य समितीच्या सभापती ब्रिंद्रा गणात्रा, पाणी पुरवठा समितीच्या सभापती पूजा गायकवाड, बांधकाम समितीच्या सभापती गौरी मावकर, शिक्षण समितीच्या सभापती जयश्री आहेर, मागासवर्गीय कल्याण समितीच्या सभापती मंदा सोनवणे, नगरसेवक राजू बच्चे, देविदास कडू, निखिल कविश्‍वर, बाळासाहेब जाधव, प्रमोद गायकवाड, भरत हरपुडे, विनय विद्वांस, संजय घोणे, सेजल परमार, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर उपस्थित होत्या.

या वेळी बोलताना नगराध्यक्षा जाधव म्हणाल्या की, प्रत्येकाने झाडे लावण्याचा व जगविण्याचा संकल्प करायला हवा. सध्या वातावरणात बदल होऊ लागला असून इतर शहरांप्रमाणे लोणावळ्याचा पारा देखील वाढू लागला आहे. नगरपरिषदेच्या वतीने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत आरपीटीएस शेजारच्या गार्डनच्या जागेचे सुशोभिकरण करुन त्या ठिकाणी “लेजर शो’ सारखे प्रकल्प राबवून अत्याधुनिक गार्डन बनविण्यात येणार आहे. शहरातील इतर गार्डन देखील विकसित करण्यात येणार आहे. शहरामध्ये सध्या विकासकामे वेगात सुरू आहेत. नगरपरिषद शहरात विकासाची कामे करत असताना नागरिकांनी देखील या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जाधव यांनी यावेळी केले.

या प्रदर्शनात परिसरातील काही नर्सरीज्‌ व पुष्प उत्पादक, टाटा कंपनी, लोणावळ्यातील काही हॉटेल्स व सोसायटीच्या सभासदांनी सहभाग घेत प्रदर्शन मांडले आहे. यामध्ये विविध रंगाची व जातींच्या फुलांसह काही शोभीवंत आणि औषधी वनस्पतींच्या झाडांचा समावेश आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी लोणावळेकर नागरिक गर्दी करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)