घरोघरी पाइप लाइनद्वारे “पीएनजी’ पुरवठा

70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रजिस्टर केल्यास 200 रुपयांची सवलत

पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे (एमएनजीएल) घरोघरी पाइप लाइनद्वारे गॅस (पीएनजी) पुरवठा करण्यात येत आहे. पीएनजी गॅस वापर अधिकाधिक नागरिकांनी करावा, यासाठी एमएनजीएलने विविध सवलती जाहीर केल्या आहेत. पाइप लाइनने गॅस पुरवठा करण्यासाठी अनामत रक्कम टप्प्याटप्याने तर, भाडेकरुंसाठी दर दोन महिन्यांनी नोंदणी शुल्क 500 रुपये आणि गॅस बिलाच्या व्यक्ती रिक्त 50 रुपये हप्ता तर, शंभरच्या वर सदनिका असलेल्या सोसायट्यांनी 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन केल्यास प्रत्येक सभासदामागे 200 रुपयांची सवलत, अशा योजना जाहीर केल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या वतीने पाइप लाइनद्वारे गॅस योजनेच्या माहिती विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी एमएनजीएलचे संचालक राजेश पांडे, वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांडे यांनी ही माहिती दिली.

पाइप लाइनच्या माध्यमातून घरामध्ये गॅसचा पुरवठा करण्यासाठी एमएनजीएलकडून 5 हजार रुपये अनामत रक्कम, नोंदणी शुल्क आणि गॅससाठी प्रत्येकी 500 रुपये असे मिळून 6 हजार रुपये आकारले जातात. त्यापैकी 5 हजार रुपये अनामत रक्कम परत केली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनामत रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबरच शंभर सदनिकांच्या वरील गृहप्रकल्पातील 70 टक्के किंवा त्यापैकी अधिक सदनिकाधारकांनी एकाच वेळी रजिस्ट्रेशन करण्याची तयारी दाखविल्यास प्रत्येक सदनिकाधारकाला 200 रुपये सवलत, त्याचबरोबरच भाडेकरूंना ही केवळ 500 रुपये रजिस्ट्रेशन शुल्क आणि दर दोन महिन्याला 50 रुपये हप्ता भरून पाइप लाइनच्या माध्यमातून गॅसचा पुरवठा करण्याची योजना लागू करण्यात आली असल्याचे पांडे यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले, शहर सिलिंडर मुक्त करण्यासाठी दोन्ही महापालिका आणि एमएनजीएल यांची लवकरच बैठक घेण्यात येईल. लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन पाईप लाईन गॅस पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू. पाईप लाईनद्वारे सीएनजी गॅस हा पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)