घरोघरी गौरी-गणपतींचा थाट

  • मावळातील घरोघरी गौराईची पूजा

सोमाटणे – सोमाटणे परिसरातील सोमाटणे, शिरगाव, दारुंब्रे, गोडुंब्रे, कासारसाई, उर्से, बेबेड ओहोळ, परंदवडी आदी गावांमध्ये गौराईचे व गणपतीचे व थाटामाटात आगमन झाले. शनिवारी घरोघरी गौराईचे आगमन झाल्याने घरातील वातावरण प्रसन्न झाले. रविवारी गौराईंना पुरणपोळी तसेच लाडू, कारंजी, चकली, शंकर पाळे, चिवडा आदीचा नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली.

गौराई ही लक्ष्मीच्या रूपाने घरात येऊन घरातील प्रत्येकाला आरोग्य, धन संपदा लाभो, विद्या, ज्ञान, सुख, शांती, अलंकार, पुत्र पौत्र प्रगती व दीर्घ आयुष्य लाभो अशी मनोभावे प्रार्थना करून गौराईंना साकडे घातले.

गौरी आमगमनाच्या वेळी विविध पारंपरिक वाद्य वाजत गाजत गौराई घरी आल्या. अनेक ठिकाणी विविध परंपरेनुसार विधिवत पूजा करण्यात आली. गौराईसमोर विविध धान्यांच्या व फळांच्या राशी घालण्यात आल्या. गरीब, श्रीमंत सर्वांच्या घरी गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. घरातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती यामध्ये नऊवारी साडी, पैठणी आदींसह नाकात नत घातल्याने महिला अधिकच शोभून दिसत होत्या. पुरुषांनी देखील पारंपरिक पोशाख परीक्षण केले होते. काही ठिकाणच्या महिलांनी सायंकाळी एकत्र येत मंगळागौरीचे गाणे आणि फेर धरत झिम्मा व फुगडी खेळल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)