घरे नियमितीकरणासाठी 15 अर्ज

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. मात्र ही बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने अर्ज मागविले. त्यानुसार केवळ पंधरा जणांनीच प्राधिकरणाकडे अर्ज केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि प्राधिकरण हद्दीत अवैध बांधकामाची संख्या लक्षणीय आहे. प्राधिकरणाचे एकूण 42 सेक्‍टर आहेत. 1 ते 33 सेक्‍टरपर्यंत नियोजनबध्द विकास झाला असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या सेक्‍टरमध्ये अतिक्रमण नसल्याचा प्राधिकरणाचा दावा आहे. उर्वरित सेक्‍टरमध्ये सुमारे तीस हजार अतिक्रमणे असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या अतिक्रमणाचा विषय राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर सातत्याने चर्चेत असतो.

सरकारी धोरणानुसार अटी आणि शर्तीच्या आधारे अवैध बांधकामे नियमित करण्याचे धोरण राबविले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्राधिकरण कार्यालयाने या संदर्भात अर्ज मागवले होते. अर्ज दाखल करण्याची मंगळवार (दि. 15) पर्यंत मुदत होती. साधारणपणे तीस हजार अतिक्रमणे असताना नियमितीकरणासाठी केवळ 15 अर्ज आले. संबंधितांनी प्राधिकरणाच्या आवाहनास प्रतिसाद दिला नसल्याचे सिध्द होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)