घरी जाणाऱ्या पोलीस सब-इन्स्पेक्‍टरची काश्‍मीरमध्ये हत्या 

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर): घरी जाणाऱ्या एका पोलीस सब-इन्स्पेक्‍टरची काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. इम्तियाझ अहमद मीर असे या सबइन्स्पेक्‍टचे नाव आहे. पुलवामा जिल्ह्यातील वाहिबग येथे इम्तियाझ अहमद मीर यांना गोळ्या घालण्यात आल्या.

आपल्या आईवडिलांना भेटण्याची ओढ लागलेल्या इम्तियाझ अहमद मीर यांनी दहशतवाद्यांना चकवा देण्यासाठी आपली दाढी काढून टाकली आणि आपले रूपरंग बदलले. सरकारी वाहनाऐवजी आपले खासगी वाहन घेतले. मात्र तरीही दहशतवाद्यांच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत, पुलवामाच्या जिल्ह्यात अगदी आतल्या बाजूला असलेल्या सोंताबग या आपल्या गावी पोहचण्यापूर्वीच त्यांना दहशवाद्यांनी गाठले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकाळी गावी जाण्याची तयारी करत असताना गावी न जाण्याचा सल्ला त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. पण दाढी काढल्याने आणि पोशाख व रूपरंग बदलल्याने आपल्याला दहशतवादी ओळखणार नाहीत असे उत्तर देऊन ते गावी जायला निघाले. दीर्घ कालावधीनंतर आईवडिलांना भेटायचे म्हणून ते खुशीत होते. पण त्यापूर्वीच मृत्यूने त्यांना गाठले.
दहशतवाद्यांनी आता पोलीसांना आपले लक्ष्य केले आहे. गेल्या महिन्यात त्यांनी दोन एसपीओ आणि एका कॉन्स्टेबलची हत्या केली.

इम्तियाझ अहमद मीर यांचा मृतदेह घेऊन येणाऱ्या पोलीस टीमवर दगडफेक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इम्तियाझ अहमद मीर अहमद घरी जायला निघाले आहेत ही बातमी दहशतवाद्यांपर्यंत कोणी पोहचवली याचा शोध पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)