घरासाठी फायद्याचा सौदा करा

उत्सवाच्या, सणासुदीच्या काळात प्रॉपर्टी बाजारात वर्दळ वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर मंडळींनी कंबर कसली आहे. ग्राहकांवर विविध ऑफरचा मारा केला जात आहे. अशा स्थितीत बऱ्याच काळापासून घरखरेदीची योजना वारंवार पुढे ढकलणाऱ्या मंडळींना ऑफर पाहून उत्साह आला आहे. म्हणूनच घर खरेदीबाबत त्यांनी चौकशीही सुरू केल्याचे चित्र आहे.

कोणता प्रकल्प चांगला आहे, कोणत्या प्रकल्पातून आपल्याला अधिक फायदा, डिस्काऊंट आहे, याबाबतची खातरजमा केली जात आहे. या चर्चेत संबंधित ग्राहकांचा बराच काळ जातो; परंतु आपण जर घर खरेदीवरून खरोखरच गंभीर असाल तर बुकिंगमध्ये परदेशातील पिकनिक किंवा गिफ्ट ऑफर घेण्याऐवजी घर खरेदीत काही तडजोड करता येते का हे पाहावे. आपल्या जीवनात घर खरेदीचा निर्णय हा मोठा असतो. अशा व्यवहारात मोटार किंवा बाइकला काहीच महत्त्व नसते. जर खरेदीचा व्यवहार करताना चांगला सौदा पदरात पडला तर दीर्घकाळासाठी तो लाभदायक ठरू शकतो आणि आपण मोठी बचतही करू शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

योजनेची निवड : सध्याच्या स्थितीत रेडी टू मूव्ह प्रोजेक्‍टमध्ये व्यवहार करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. या माध्यमातून एकाचवेळी अनेक फायदे घेऊ शकतात. घराची बुकिंग करताना सर्वात अगोदर बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड पाहा. जर बिल्डर विश्‍वासू असेल आणि यापूर्वीचे प्रोजेक्‍ट पूर्ण केलेले असतील तरच आपण चर्चा पुढे सुरू ठेवावी. जर बिल्डर नवीन असेल तर सावधपणे व्यवहार करायला हवा. तो कितीही आकर्षित सवलती देत असेल तरीही त्याच्याशी सावधपणे व्यवहार करायला हवा. अर्थात आता रिअल इस्टेटमधील वाईट काळ गेला आहे. बांधकाम अवस्थेतील योजनेत पैसा गुंतवणे ही जोखीम राहू शकते. गृहकर्जाचा हप्ता आणि घरभाडे असा दोन्हीचा भार ग्राहकांना सोसावा लागतो. रेडी पझेशनचा एक लाभ असा की, त्यावर जीएसटी आकारला जात नाही. बांधकाम अवस्थेतील प्रकल्पांसाठी 12 टक्के जीएसटी भरावा लागतो. अर्थात, काही अटींसमवेत ग्राहकांना काही प्रमाणात इनपूट क्रेडिटची मुभा दिली आहे. मात्र, अशा सुविधांच्या माहितीअभावी खरेदीदार त्याचा संपूर्ण लाभ मिळवू शकत नाहीत. यासंदर्भात बिल्डर ग्राहकांना योग्य माहिती देत नाहीत.

नवीन ऑफर कोणती : नवीन योजनेत बहुतांश बिल्डर 10:90 सारख्या सबऱ्हेशन योजनांची ऑफर देत आहेत. यानुसार बुकिंगच्या काळात ग्राहकांना दहा टक्के रक्कम कमी द्यावी लागते. त्यानंतर गृहप्रवेशापर्यंत कोणतीही रक्कम देण्याची गरज भासत नाही. या योजनेनुसार बिल्डर ग्राहकाच्या प्रोफाईलवर कर्ज घेतात आणि एका कालावधीपर्यंत त्याच्या व्याजाची भरणा करतो. यासारख्या योजना ग्राहकांपेक्षा बिल्डरला फायद्याच्या ठरतात. जर आपण सबऱ्हेशन योजनेंतर्गत घर खरेदी करत असाल तर बिल्डरकडून निश्‍चित कालावधीऐवजी पजेशनपर्यंत नो इएमआयचा पर्याय निवडा. अनेक बिल्डर फ्री पार्किंगबरोबर पीएलसीच्या नावावर कोणतेही शुल्क आकारत नाहीत. अनेक मोठे बिल्डर आपली इन्व्हेंटरी कमी करण्यासाठी फ्लॅटवर पाच टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काऊंट देत आहेत. लहान बिल्डर आपली रोखीची गरज भागवण्यासाठी दहा टक्‍क्‍यांपर्यंत सवलत देत आहेत. अर्थात ही सवलत फ्लॅटच्या बेसिक किंमतीवर अवलंबून असते.

सबसिडीचा फायदा : केंद्र सरकारने वर्ष 2022 पर्यंत सर्वांसाठी घराचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. हे ध्येय गाठण्यासाठी सरकार पहिले घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना व्याजदरात सबसिडी देत आहेत. सुरुवातीला ही योजना 2017 पर्यंत होती. आता या योजनेला 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जर आपणही या कालावधीत घर खरेदी करत असाल तर परवडणाऱ्या किमतीबरोबरच या योजनेनुसार 2.67 लाखाचे अंशदानही मिळवू शकता. या योजनेत सर्वच बॅंका आणि हौसिंग फायनान्स कंपन्या होमलोन देत आहेत. सबसिडीचा लाभ ग्राहकांच्या वार्षिक उत्पन्नानुसार दिला जातो. यासाठी घर पसंत केल्यानंतर बॅंकांना संपर्क करावा आणि कितीपर्यंत सबसिडीचा लाभ मिळेल, याची माहिती मिळवावी. लक्षात ठेवा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना सबसिडीचा फायदा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)