घराला मिळेल योग्य भाव (भाग-१)

एखाद्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणाने घर विकावे लागते. कधी पैशाची निकड म्हणून तर कधी जीवनशैलीत बदल करण्यासाठी. अशा स्थितीत आपल्या घराला जास्तीत जास्त भाव मिळावा, असे प्रत्येक घरमालकाला वाटत असते. अर्थात ही स्थिती नेहमीच नसते. विशेषत: जुन्या घरांना मनाप्रमाणे किंमत येत नाही. कोणत्याही घराची किंमत ही सद्यस्थितीच्या बाजारभावाप्रमाणे ठरविली जाते. घराला जर चांगली किंमत हवी असेल तर अंतर्गत सजावट, डागडुजी करण्यावर भर द्यावा. चांगल्या लोकेशनवरही घर खराब स्थितीत असेल तर मालकाचे नुकसान होणे स्वाभाविक आहे. मात्र त्यावर काही प्रमाणात पैसे खर्च करून घराला नवीन रूप दिले तर घराला अपेक्षेपेक्षा चांगली किंमत येऊ शकते.

जागेचा योग्य वापर : घरात जर जागेची कमतरता नसेल तर चांगली बाब आहे. त्याचा उपयोग योग्य तऱ्हेने करायला हवा. आपण केलेली दुरुस्ती किंवा बदल हा समोरील व्यक्‍तीला आवडेलच असे नाही. आजकाल बहुतांश घरात नैसर्गिक उजेडाचा कोणताही बंदोबस्त नसतो. किचनमध्ये किंवा हॉलमध्ये कमी प्रकाश किंवा अंधाराच असतो. अशावेळी दिव्यांचा आधार घ्यावा लागतो. मात्र नैसर्गिक उजेडला प्राधान्य देणारी अनेक मंडळी आपल्याला दिसतील. मोठ्या खिडक्‍या असणाऱ्या घरात वीज जरी नसली तरी फारसा फरक पडत नाही. जर नैसर्गिक हवा आणि प्रकाशाची व्यवस्था केल्यास आणि त्यावर थोडी मेहनत केली तर घराची किंमत निश्‍चितच चांगली मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्टोरेजवर लक्ष : कोणत्याही घरातील सामानाची साठवणूक करण्याची जागा महत्त्वाची मानली जाते. घराला चांगली किंमत येण्यासाठी कपाटाची स्थिती एकदा तपासून पाहा. जर दरवाजे खराब झाले असतील किंवा भेगा पडल्या असतील तर बदलण्याचा विचार करा. तसेच जुन्या कपाटांना रंग दिल्यास त्याचा लूकही बदलतो.

घराला मिळेल योग्य भाव (भाग-२)

फिक्‍सचर्स: भिंतीतील कपाट साधे आणि आधुनिक असावे. बाथरूममध्ये व्हाइट आणि क्रिम कलरच्या फिक्‍सचर्सचा वापर करावा. कारण अनेकांना विविध रंगाचे फिक्‍सचर आवडत नाहीत. त्याचबरोबर फिक्‍सचर्समध्ये विजेचे नियोजन चांगल्या रितीने करावे.

– जगदीश काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)