घराला मिळेल योग्य भाव (भाग-२)

घराला मिळेल योग्य भाव (भाग-१)

टाइल्सवर लक्ष द्या : काही मंडळी फ्लोरिंगसाठी मोझॅक आणि टाइल्सला पसंती देतात. तर काही जणांना साध्या स्वरूपाचे फ्लोअर आवडतात. बहुतांश लोकांची आवड लक्षात घेता फ्लोरिंग साधे ठेवण्याचाच विचार करायला हवा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रंगकाम करून घ्या: कोणत्याही जुन्या घराला नवीन करण्यासाठी सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे त्याची पेटिंग करणे. पेंटसाठी न्यूट्रल कलर्सचा वापर करायला हवा. विशेषत: खोलीत पांढरा डिस्टेंपर हा मोठा आणि ब्राइट लूक देतो. त्याचबरोबर दरवाजे आणि खिडक्‍यांना पेंट देऊन घराला नवखेपण आणा.
आपल्या घराला चांगली किंमत यावी यासाठी सर्वच घरमालक प्रयत्नशील असतात. यासाठी आणखी काही टिप्स सांगता येतील.

आपल्या भागातील आपल्या घरासारखे अन्य घरांची यादी तयार करावी. त्या घराचे वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. विक्री होणाऱ्या घरांची माहिती घ्या. संबंधित घर मालकांशी चर्चा करा आणि किमतीचे आकलन करा.

घर विक्रीच्या कामासाठी प्रॉपर्टी एजंटची मदत घेऊ शकता. मात्र घराची किंमत आपणच शोधून काढल्यास आणि निश्‍चित केली तर फायदेशीर ठरेल.आपल्या परिसरातील एंजटांना किंमतीचे आकलन करण्याचे सांगा. ते कशाप्रकारे आकडे जमवतात, ते पाहा.

घराच्या विक्रीचे कारण एजंटना सांगा. व्यवहारासाठी आपण किती दिवस थांबू शकता आणि किमतीबाबत किती तडजोड करू शकतो, हे सांगा. यासंदर्भात काही गैरसमज निर्माण झाले तर एजंट संभाव्य खरेदीदारासमोर आपली चुकीची प्रतिमा उभी करू शकतो.

जर आपल्या घराची वास्तविक किंमत ठाऊक असेल तर अव्वाच्या सव्वा सांगणाऱ्या किंवा बढाया मारणाऱ्या एजंटपासून दूर राहणे हिताचे ठरू शकते. जर आपल्या भागात एक कोटीला घर विकले जात असेल आणि एंजट दीड कोटी किंमत सांगत असेल तर सावधानतेने व्यवहार करणे महत्त्वाचे ठरेल.

– जगदीश काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)