घराबाहेर कपडे धुणे महिलेला महागात

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत महापालिकेची कारवाई

पुणे – घरासमोर कपडे धुवणे धानोरी येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. घराबाहेर कपडे धुवून त्याचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी स्वत: या महिलेस 180 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच यापुढे घरासमोर कपडे धुवू नयेत, अशी समज देण्यात आली आहे.

महापालिकेकडून शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. त्या अंतर्गत “लक्ष्य पुणे’ ही मोहीम राबविली जात असून अधिकारी स्वत: दररोज सकाळी आरोग्य कोठ्यांच्या पाहणीसह शहर स्वच्छतेची पाहणी करत आहेत. रविवारी सकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या धानोरी येथील आरोग्य कोठी क्रमांक 1 ची पाहणी केली. यावेळी त्याच परिसरातील एक महिला घरासमोर कपडे धुवत होती. तर, हे धुण्याचे पाणी रस्त्यावर आले होते. ही बाब चुकीची असल्याने मोळक यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून या महिलेसह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना समज देऊन त्यांना स्वच्छ भारत सर्वेक्षणाची माहिती देण्यात आली. तसेच त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली म्हणून 180 रुपयांचा दंडही आकारण्यात आला. तसेच यापुढे कपडे घरातील मोरीमध्येच धुण्यात यावेत, अशा सूचनाही केल्या.

…अन्‌ कचरा टाकताना रिक्षावाला सापडला
आरोग्य कोठीची पाहणी केल्यानंतर मोळक यांनी या भागात ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकतात, अशा “क्रॉनिक स्पॉट’ची पाहणी करण्यासाठी गेले असता, एक रिक्षावाला घरातील कचरा प्लॅस्टिक पिशवीमध्ये आणत असल्याचे दिसून आले. यावेळी मोळक यांनी या रिक्षावाल्यावर कारवाई केली. त्याच्याकडूनही दंड वसूल केला. तसेच पुन्हा हा प्रकार केल्याचे आढळून आल्यास 5 हजार रुपये दंड आकारण्याची तंबी देण्यात आली. तसेच कचरा परत घेऊन जाण्यास सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)