घरात घुसून मोबाईल चोरणाऱ्याला पोलीस कोठडी

पुणे- बाल्कनीतून घरात घूसून मोबाईल चोरीच्या दोन घटना करणाऱ्या तरूणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शुभम रमेश लोंढे (वय 20, रा. दत्तवाडी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत किशोर भागवत जोगदंड (वय 20, रा. आंबिल ओढा कॉलनी, दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. 7 ते 8 सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी आणि त्यांचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरातून प्रत्येकी एक असे दोन मोबाईल चोरल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी लोंढे याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी गुन्ह्यातील एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. दुसरा मोबाईल चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. मात्र, तो कोठे आहे, हे सांगत नाही. त्याच्या तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्यची मागणी सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)