घरात घुसून चटके देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलीस कोठडी

पुणे- अल्पवयीन मुलगी एकटी असताना घरात घुसून पायावर चटके देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तरूणाला अटक केली. त्याला 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांनी दिला आहे.
किरण प्रकाश पवार (वय 24, रा. अजनुज, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 16 वर्षीय पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 21 जून रोजी दुपारी शिरूर तालुक्‍यातील कारेगाव येथे घडली. फिर्यादी घरात एकटी होती. किरण त्याच्या ओळखीचा होता. त्याने तिच्या घरात प्रवेश केला. मचिसच्या काडीने दोन्ही पायांना चटके दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मोबाईलमध्ये तिचे अश्‍लील फोटो काढले. घडलेल्या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तिला, तिच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली. या प्रकरणात पोलिसांनी किरण याला अटक करून विशेष न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणि अश्‍लील फोटो काढलेला मोबाईल जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

Remarks :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)