घरात घुसून अकरा वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी

पुणे- पाण्याचे कॅन घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून दरवाजा लावून अकरा वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीला पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
आनंदमय लालबिहारी महतो (वय 38, रा. लोहगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना लोहगावच्या हद्दीत 25 जुलै 2015 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. घटनेवेळी पीडित मुलगी घरात एकटी होती. हे पाहून घरात घुसून महतो याने तिच्याशी अश्‍लील चाळे केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर युक्तीवाद करताना आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील कावेडीया यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8 नुसार तीन वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड, कलम 10 नुसार 5 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड, भादवी कलम 451 (घरात जबरदस्तीने घुसणे) नुसार तीन महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये दंड, कलम 342 नुसार 3 महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)