घरात कुकचे काम करते दिशा?

सिनेसृष्टीतील कलाकारांकडे पाहून अनेकांचा हा समज असतो की त्यांच्या घरी दिमतीला नोकर-चाकर असतील, जेवण बनवायला कुक असतील, फक्‍त ऑर्डर दिली की झालं ! अर्थात बऱ्याचशा कलाकारांच्या घरात हे चित्र पाहायला मिळते. पण आचाऱ्यांनी, कुकने बनवलेल्या पदार्थांना आपलेपणाची चव असतेच असे नाही. त्यातही सिनेसृष्टीत अनेक कलाकार हे महाराष्ट्राबाहेरच्या प्रांतातून आलेले आहेत. त्या-त्या प्रदेशातील, घराण्यातील विशिष्ट पदार्थांची चव हॉटेलमध्ये तर सोडाच; पण कित्येकदा कुकनाही जमत नाही. परिणामी, कुठे ना कुठे मनात आणि जिभेवर ती चव रेंगाळत राहते. त्या पदार्थांची आठवण येत राहते. कदाचित म्हणूनच, अनेक नायिका स्वतःच अॅप्रन बांधून किचनमध्ये स्वतः बनवलेले जेवण खाण्याला प्राधान्य देतात. दिशा पटनी ही यापैकीच एक.

दिशा पटनीचा ग्लॅमरस अंदाज अनेकांना घायाळ करणारा ठरला आहे. मात्र खाण्या-पिण्याच्याबाबतीत दिशा पक्‍की देसी गर्ल आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीतून आलेली दिशा मुंबईमध्ये वास्तव्यास असून इथे तिला घरच्या पदार्थांची आठवण नेहमीच सतावत असते. सध्या दिशा सलमानसोबत “भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यादरम्यान जेव्हा घरचं अन्न खाण्याची इच्छा होते तेव्हा तिला आईच्या रेसिपीजचा उपयोग होतो. चित्रीकरण संपल्यानंतर दिशा आपले जेवण स्वतः बनवते. बहुतेकदा ती आपल्या आवडीचे पदार्थ अगदी आईसारखे बनवते. कित्येकदा तर पदार्थ बनवत असताना त्यामध्ये काही विसरू नये यासाठी ती व्हिडिओ कॉल करून आईची मदतही घेते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजकाल सर्वच कलाकार फिटनेस कॉन्शस बनले आहेत. दिशाही त्याला अपवाद नाही. ती फिटनेससाठी भरपूर प्रथिने असणारा आणि तंतूमय पदार्थ असणारा आहार घेते. मात्र काही वेळा ती जिव्हातृप्तीसाठी आपल्या आवडीचे चटपटीत पदार्थही बनवते. यामध्ये खास करून राजमा आणि भात यांचा समावेश असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)