घरात अडकलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीची सुखरूप सुटका

  • कासारवाडीतील सरिता अपार्टमेंटमध्ये अग्नीशामक दलाची यशस्वी कामगिरी

पिंपरी – दरावाजा “लॉक’ होऊन घरातच अडकलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. कासारवाडीतील सरिता अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (दि. 4) दुपारी ही घटना उघडकीस आली.
रिदा फातिमा असे त्या चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी अग्निशामक दलाला मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास वहीद खान यांनी कासारवाडी येथील सरिता अपार्टमेंट मुलगी अडकल्याची खबर दिली. यावेळी अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडीतील सरिता अपार्टमेंटमध्ये फातिमा कुटुंबिय वास्तव्यास आहे. सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर रिदा आई-वडिलांसह राहते. मंगळवारी दुपारी रिदाची आई अलिता या घऱकाम करीत होत्या. त्यांनी धुतलेली भांडी ही खिडकीच्या गॅलरीत ठेवली. त्यातील एक भांडे खिडकीतून खाली पडले. ते भांडे आणण्यासाठी रिदाची आई खाली गेल्या. त्यावेळी रिदा ही घऱात एकटीच खेळत होती. आईने उघडा ठेवलेला दरवाजा रिदाने खेळत- खेळत बंद केला. दरवाजाला “लॅच’ पद्धतीचा असल्याने तो आतून बंद झाला. रिदाच्या आईला हे लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांकडे धाव घेतली व अग्निशामक दलाला याबाबतची माहिती दिली.

रस्त्याची वाहतूक कोंडीतून मार्ग काढत अग्निशामक दलाचे जवान घटनास्थाळी पोहोचले. जवानांनी साहित्याच्या मदतीने दरवाजा मध्यभागी तोडून लॉक उघडले. रिदा हिला सुखरुप आईच्या कुशीत गेली. घरकाम करीत असताना अलिता यांनी घरातील मंद आचेवर गॅस सुरू होता; मात्र सुदैवाने कोणतीही दुघर्टना झाली नाही.

अग्निशामक दलाचे लीडर अशोक कानडे, अमोल चिपळूणकर, फायरमन सुशीलकुमार राहणे, अक्षय पाटील, प्रशांत पवार, विकास कुठे, महेश लांडगे, वाहनचालक प्रवीण लांडगे यांनी केली. शहरात लॅच पद्धतीच्या दरवाजामुळे बाळ घरात कोंडणे, खिडकी किंवा गॅलरीत अडकणे अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या अगदी मुलांना घरात एकटे सोडू नये, असे आवाहन अग्निशामक दलाकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)