घरातील कचऱ्यासाठी दरमहा मोजा 60 रुपये

पिंपरी – घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्य शासनाकडून नवीन कायदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार घरातील कचऱ्यासाठी नागरिकांना 60 रुपये महिन्याला द्यावे लागणार आहेत. हा दर व्यावसायिकांसाठी जास्त असणार आहे. विशेष म्हणजे नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून ठेवावा लागणार आहे. तसे न केल्यास 60 रुपये ते 15 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणासोबत कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. रोज हजारो टन कचरा निर्माण होत आहे. याची विल्हेवाट लावणे फारच जिकरीचे झाले. कचऱ्यामुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. त्यामुळे याची विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. यासाठी राज्य सरकारने घनकचरा व्यवस्थानासंदर्भात एक नवीन कायदा केला आहे. त्यानुसार घरात आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना ओला आणि सुका कचऱ्याची वर्गवारी करावी लागणार आहे. दोन्ही प्रकारचा कचरा दोन स्वतंत्र कचरापेटीत ठेवावा लागणार आहे. हा कचरा एकत्र ठेवल्यास पहिल्यावेळी 60 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. दुसऱ्यावेळी 120 रुपये तर तिसऱ्या वेळी 180 रुपये दंड ठोठावण्यात येईल. जास्त कचरा निर्माण करणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम जास्त असणार आहे. त्यासाठी 5 हजार ते 15 हजारांच्या घरातही दंडाची रक्कम असणार आहे. तर कचरा जाळल्यास 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. सार्वजनिक समारंभादरम्यान कचरा झाल्यास अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य सरकारने एक वर्षात घनकचरा व्यवस्थानासाठी उपविधी करण्याचे आदेश सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना दिले होते. मात्र, एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेने ही उपविधी तयार केले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारनेच उपविधी तयार करून सर्वांना लागू केले आहेत. 19 डिसेंबरला राज्य सरकारचे उपसचिव कैलास बधान यांच्या स्वाक्षरीने याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. महापालिकांसोबत नगरपालिका आणि नगरपंचायत यांनाही हा कायदा लागू करण्यात आला आहे. कचरा संकलनाची रक्कम आणि दंडाची रक्कम यात फरक आहे. घरगुती कचऱ्यासाठी लोकांना 40 रुपये महिना द्यावा लागेल. तर दंडाची रक्कम ही 50 रुपये ते तीन हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

असे असतील दर…
घरगुती कचरा संकलनासाठी अ व ब वर्ग महापालिका हद्दीतील कचरा संकलनासाठी शासनाने वेगवेगळे दर ठरवून दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्ग मध्ये समावेश होत असल्याने घरगुती कचऱ्यासाठी 60 दुकानांसाठी 90, शोरूम, हॉटेल, गोदामे, उपहारगृह, हॉटेल्स आणि 50 खाटापर्यंतच्या रुग्णालयांसाठी 120, लॉजिंग व हॉटेलसाठी 150, फेरीवाले, 51 खाटांच्या पुढील रुग्णालयांसाठी 180, शैक्षणिक, धार्मिक संस्था, सरकारी कार्यालयांसाठी दरमहा 90 रुपये आकारण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)