घरातच तयार करा एंटरटेंनमेंट झोन

दिवसभर काम करून थकून भागून घरी परतलेल्या कोणत्याही व्यक्तीला मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर किंवा कुटुंबीयांसमवेत विरंगुळा म्हणून आवडीचे पिक्‍चर, गाणे पाहणे, ऐकणे स्वाभाविक आहे. मात्र, मनोरंजनासाठी घराबाहेर जाण्याचा कंटाळा येतो. अशा स्थितीत घरातच एंटरटेन्मेंट झोन तयार केले तर घरबसल्या मनोरंजनाचा आस्वाद घेता येतो. चित्रपट, संगीत किंवा गेम्सबरोबर मनोरंजनाची साधनं आज घरबसल्या मिळत आहेत. एंटरटेन्मेंट रूम्सची व्यवस्था बहुतांश घराचा एक भाग बनत चालली आहे. आपल्या घरात एखादी खोली फारशी वापरात नसेल किंवा गोदामाप्रमाणे तिचा वापर करत असाल तर त्याला एंटरटेन्मेंट रूमचा लूक देऊ शकतो. जसजसे तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे, तसतसे प्रत्येक घरात एखाद्या खोलीत एंटरटेन्मेंट झोन म्हणून तयार करण्याचा ट्रेंड वाढला आहे. या खोलीचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नाही तर बर्थ डे पार्टी, किटी पार्टी किंवा अन्य लहानसहान कार्यक्रमासाठी देखील करता येतो.

अनेक शहरात बंगल्यांची उभारणी करताना बहुतांश मंडळी बेसमेंटलाच एंटरटेन्मेंटची खोली म्हणून वापरताना दिसून येत आहे. त्याला सर्वसाधारणपणे होम थिएटर म्हणून ओळखले जाते; परंतु मुंबईसारख्या शहरात जेथे बहुतांश नागरिक फ्लॅटमध्ये राहतात, अशा ठिकाणी एंटरटेन्मेंट झोनला जागा मिळत नाहीे. अशा स्थितीत फ्लॅटमधील एखाद्या भागाला एंटरटेन्मेंट कॉर्नर म्हणून उपयोग करता येतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गॅझेटस्‌ : कोणत्याही मनोरंजन खोलीचे मुख्य आकर्षण म्हणजे अनेक प्रकारचे गॅझेटस्‌ किंवा इलेक्‍ट्रॉनिक उपकरण होय. जर आपण वेगळ्या शैलीत चित्रपट पाहण्यास उत्सुक असाल तर आपल्या खोलीत प्रोजेक्‍टर स्क्रीन आणि आरामदायी खुर्ची असणे गरजेचे आहे. जर खोली मोठी असेल तर याठिकाणी पूल टेबल, गेमिंग कन्सोल, सराऊंड साऊंडच्या सुविधांबरोबरच चांगले म्युझिक प्लेअरची रचना करता येते. आता मोठमोठ्या स्क्रीन टीव्हीची लोकप्रियता वाढली आहे. अशा टीव्हींना जागाही कमी लागते. आपल्या बजेटवर स्क्रीनचा आकार अवलंबून आहे. 32 इंचपासून 55 इंचपर्यंत टीव्ही उपलब्ध आहेत. या दिवसात 55 इंचाच्या टीव्हीपासून मोठ्या स्क्रीन प्रोजेक्‍टरचा ट्रेंड देखील प्रचलित आहे. याशिवाय थ्रीडी टीव्ही देखील लोकप्रिय ठरत आहेत. यात संगणकही इनबिल्ट आहे. उपकरणे अस्ताव्यस्त राहणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागेल.

लोंबळकणाऱ्या तारा नको : एन्टरटेन्मेंट झोनमध्ये उपकरणाची गर्दी असल्याने तारांची भाऊगर्दी होते. जर रूममध्ये ठिकठिकाणी तारा दिसू लागल्या तर रूमचा लूक आकर्षक राहणार नाही. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या वायरची रचना करावी. जसे की एव्ही रॅकचा वापर करावा. त्यात वायर मागे झाकले जाते.

आरामदायी बैठक : एन्टरटेन्मेंट खोलीत आरामात बसता येईल, अशी रचना असावी. सर्वाना एकत्र बसून सिनेमा पाहता येईल किंवा गाणी ऐकता येईल, अशा प्रकारची सोय करायला हवी. बसण्याची जागा आणि स्क्रीन यातील अंतर सुरक्षित असावे. जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाही, मानही दुखणार नाही. यासाठी आरामदायी सोफा, लांज चेअर्सची निवड करू शकता. जर खोली लहान असेल तर कोपऱ्यात काऊंटर तयार करू शकता आणि त्याचबरोबर स्टूल्सही ठेवण्याची व्यवस्था करावी. इंटरटेनमेंट झोनमध्ये कपाटची रचना करावी. याठिकाणी पाण्याच्या बाटल्या, चहाचे कप ठेवता येतील.
आकर्षक लायटिंग व्यवस्था : खोलीत पुरेसा उजेड असणे महत्त्वाचे आहे. एकदम अंधारही नको आणि भक्क उजेडही नको. खोलीत डिमरची व्यवस्था असावी. स्क्रीनवर थेट उजेड पडणार नाही, अशा रितीने दिव्यांची व्यवस्था करावी.

– विजयालक्ष्मी साळवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)