आज दिल्ली येथे इंडिया टुडेच्या ‘माईंड रॉक्स’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यकर्मासाठी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांचे प्रवक्ते हजार होते. बाजेपी कडून संबित पात्रा, काँग्रेसकडून प्रियांका चतुर्वेदी आणि आपतर्फे राघव चढ्ढा यांनी आपापल्या पक्षाचे नेतृत्व केले.

या तिन्ही नेत्यांमध्ये राजकीय घराणेशाहीवर तिखट चर्चा झाली. बीजेपीचे प्रवक्ते संबित पात्रा  म्हणाले की, ‘रात्र-रात्र भर रस्त्यांवर पोस्टर्स लावून अमित शाह यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द घडवली आहे.’

या चर्चेची सुरुवात राजकारणामध्ये तरुणांचे योगदान? यापासून झाली. तिन्ही पक्ष्याच्या प्रवक्त्यांनी यावर सकारात्मक मते दिली. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या,काँग्रेस हा पक्ष सुरुवातीपासूनच युवकांसाठी खूप कार्य करत आहे. बीजेपीचे संबित पात्रा म्हणाले, २०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत येण्यामागे तरुणांचे योगदान मोठे आहे.

यानंतर संबित पत्रा यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टिपण्णी करताना म्हणाली की, देशातील काही मोठ्या पक्षाचे राजकारण एका कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार चालते आहे आणि हे चुकीचे आहे.  यानंतर प्रियांका यांनी त्याला विरोध केला.

आपतर्फे बोलताना राघव चढ्ढा म्हणाले की, देशाचे राजकारण एखाद्या घराण्याकडून चालणे हे चुकीचे असून सर्वांनी यामध्ये यावे. सर्वांना त्याचा भाग होण्याचा अधिकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)