घराची विक्री 13 टक्‍क्‍यांनी वाढली

अपर्णा देवकर

देशातील प्रमुख 8 शहरांत घरांच्या विक्रीत आर्थिक वर्ष 2018 दरम्यान 13 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. यातूनच निवासी गृहकप्रकल्पाला अच्छे दिन येत असल्याचे संकेत मिळत आहेत. घराच्या विक्रीत वाढ होण्यासाठी मध्यमवर्गीय गटाचे मोठे योगदान राहिले आहे. तत्पूर्वी गेल्यावर्षी ही वाढ केवळ 5 टक्केच राहिली होती. प्रमुख बाजारात मुंबई मेट्रोपोलिटिन विभागात सर्वाधिक 25 टक्के विक्री राहिली आहे. यासंदर्भात लियासेज फोरास रिअल इस्टेट रेटिंग अँड रिसर्चने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईनंतर दिल्लीचा नंबर राहिलेला आहे. एनसीआर येथे घराच्या विक्रीत 19 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. दक्षिण भारतात चेन्नई, बंगळुरू येथे मात्र रिअल इस्टेट बाजारात सुस्ती दिसून आली आहे. घराच्या मागणीत परवडणाऱ्या घराच्या श्रेणीचा मोठा हातभार राहिलेला आहे. मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, कोलकता आणि अहमदाबादसह टियर 1 शहरात एकंदरित विक्रीत मध्यमवर्गीय श्रेणीचे योगदान 2018 च्या चौथ्या तिमाहीत 18 टक्के राहिलेले आहे. गृहकर्जावरील घसरलेले व्याजदर आणि परवडणाऱ्या घरांना सरकारचे प्रोत्साहन यामुळे निवासी घरकुल विक्रीला बळ मिळाले आहे. पंतप्रधान गृहकुल योजनेनुसार क्रेडिट लिंक्‍ड सबसिडी स्कीममध्ये दीर्घकाळासाठी कर्ज, 645 चौरस फूट कार्पेट एरियाचे अपार्टमेंटस्‌ आणि करसवलतीचे फायदे या बळावर हाऊसिंग सेक्‍टरला बुस्ट मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)