घराघरात हवी मूर्तीदानाची संकल्पना

वडगाव : जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी कुटुंबियांसोबत गणपती बाप्पाची पूजा केली.

वडगाव मावळ : मावळ तालुक्‍यातील वडगाव-खडकाळा गटाचे पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव आबाजी वायकर हे त्यांच्या कुटुंबात पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करतात. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव काळात घराच्या गणपतीची प्रतिष्ठापना ही डीजे, गुलाल व फटके मुक्‍त करून पारंपारिक वाद्यांच्या गजरात केली जाते.

यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून बाबुराव वायकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांच्या हस्ते सव्वा किलो चांदीचा हार पुणे जिल्हा परिषद कार्यालयातील गणपती बाप्पाला तसेच नगरकर तालीम लक्ष्मीरोड (पुणे) येथील गणरायाला सव्वा किलो चांदीचा हार अर्पण केला. त्याचबरोबर आपली संस्कृती टिकवण्यासाठी 38 गणेशोत्सव मंडळांना ढोल-ताशाचे वाटप करण्यात आले. अंगणवाडी बालकांना खाऊ वाटप करण्यात आला. मावळ तालुक्‍यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आरतीला उपस्थित दाखवून परिसरात कोणती विकास कामे आवश्‍यक आहे, याचा आढावा घेतो.

-Ads-

गणेशोत्सव काळात वेगळे चैतन्यपूर्ण व आनंदी वातावरणात असल्याने घरच्या गणपती बाप्पाची आरती सकाळी नऊ वाजता तसेच सायंकाळी सात वाजता सहकुटुंब करतो. गणेश मूर्ती नदी, तलाव, विहिरीत विसर्जन करण्यापेक्षा त्या मूर्त्यांचे दान करून सात दिवसातील पूजेचे साहित्य निर्माल्य कलशात टाकून पर्यावरणाचा ऱ्हास व प्रदूषण रोखण्याचा संदेश देतो. जनतेला कर्तृत्ववान नेतृत्वाची ओळख असतेच 2017 च्या पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहून अधिकृत पक्षांच्या उमेदवारांचा पराभव केला. वडगाव-कातवी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणण्यासाठी महत्वपूर्ण नियोजन केल्याने ते वडगावच्या राजकारणातील “किंगमेकर’ ठरले. या काळात अनेक मतदार, मित्र व पाहुण्यांना भेटण्याचा योग येतो.

गणपती बाप्पा गगनाला भिडलेल्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे महाग झाले आहे. दैनंदिन वाढत्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीने धसका घेतला आहे. शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी झाल्याने तसेच दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्‍कील केले आहे. वाढती महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला आनंदात जगण्याचा अधिकार देण्याची भाजप सरकारला सुबुद्धी दे.
– बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्य, वडगाव-खडकाळा गट.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)