घरांबाबत जपानची उलटी तऱ्हा-लाखो घरे रिकामी पडली 

टोकियो (जपान) – घरांबाबत जपानची उलटी तऱ्हा झाली आहे. जगभरात घरांची टंचाई जाणवत असताना जपानमध्ये लाखो घरे रिकामी पडली आहेत. मालकांनी सोडून दिलेल्या आणि कोणीही राहायला तयार नसलेल्या या घरांचे काय करायचे? हा जपानच्या सरकारसमोर असलेला एक यक्षप्रश्‍न आहे.

जपानमधील अनेक लहान लहान शहरे आणि गावांमध्ये अशा ओसाड पडलेल्या घरांची संख्या 8 लाखांपेक्षाही अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घरी अशी ओसाड पडण्याची अनेक कारणे आहेत. नैसर्गिक आपत्ती, वृद्‌ध व्यक्ती आणि अकालमृत्यू ही काही प्रमुख कारणे. ज्या घरामध्ये कोणाचा अकालमृत्यू झाला असेल त्या घरात कोणी राहू इच्छित नाही. आणि अशा घरांना गिऱ्हाईकही मिळत नाही.

अकालमृत्यू झालेली घरे विकणे फार मुश्‍किल असल्याचे एजंट लोकही सांगतात. अशी घरे अगदी नाममात्र किमतीला विकण्याचा वा मोफत देण्याचा जपान सरकार विचार करत आहे. अगदी जुनी असलेली, मोडकळीस आलेली घरेही कोणी राहत नसल्याने रिकामी पडली आहेत. सरकार अशा घरांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत देण्यास तयार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जपानमधील 70 टक्के लोकसंख़्या ही अपार्टमेंटसमध्ये राहते. ग्रामीण भाग आणि लहान शहरांमध्ये रिकाम्या घरांची समस्या निर्माण झालेली आहे. या घरांतील लोक शहरांत राहायला गेलेले आहेत.

सन 2033 पर्यंत अशा रिकाम्या सोडून दिलेल्या घरांची समस्या उग्र रूप धारण करणार असल्याचा जपानमधील नूमरो संस्थेचे म्हणणे आहे. सन 2033 पर्यंत रिकाम्या घरांची संख्या 21.5 लाखापेक्षाही अधिक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. नवीन घरांच्या निर्मितीवर मर्यादा घालणे हा एक उपाय सुचवण्यात आलेला आहे, पण त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणाची शक्‍यता नूमरोचे वरिष्ठ सल्लागार वतारू सकाकिबारा यांनी व्यक्त केली आहे.,

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)