घरांचे शेकडो प्रकल्प रेंगाळले

भांडवल असुलभता; मंजुरीचे काम गोगलगाईच्या गतीने: समिर जसुजा
मुंबई: 3.3 लाख कोटी रुपयाचे 1687 स्किममधील 4.65 लाख इतक्‍या घराचे प्रकल्प रेंगाळले आहेत. ते प्रकल्प कधी पूर्ण होतील हे कोणालाही सांगता येणार नाहीत. त्यामुळे कंटाळून काही ग्राहक न्यायालयात जात आहेत. हा सर्व विलंब भांहवल असुलभता आणि वेगात मंजुरी मिळत नसल्यामुळे होत असल्याचा दावा प्रॉप इक्‍विटी या संस्थेने केला आहे.
रिऍल्टी क्षेत्रातील घडामोडीचे विश्‍लेषण करणाऱ्या या संस्थेने म्हटले आहे की या रेंगाळेल्या प्रकल्पाचे क्षेत्रफळ थोडे थोडके नाही तर तब्बल 60 कोटी वर्ग फूट इतके आहे. या प्रकल्पाना 2 ते 8 वर्षाचा उशीर झाला आहे. त्याबरोबर या क्षेत्रात अजूनही असलेल्या संदिग्धतामुळे हे प्रकल्प कधी पूर्ण होतील हे कोणीही सांगू शकणार नाही.
या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक समिर जसुजा यांनी सांगितले की, रिऍल्टी क्षेत्र गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रश्‍नांचा सामना असहायपणे करीत आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामकाजाचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही शहरातील कमी किमतीच्या घराची विक्री वाढत असल्याची लक्षणे दिसत असली तरी सर्वसाधारण परिस्थिती अजूनही सुधारलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की, याला अनेक कारणे आहेत. भांडवल पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे अवघड होत चालले आहे. अगोदर तयार असलेल्या घराची विक्री होत नाही. पर्यावरणासारख्या मंजुऱ्या लवकर मिळत नाहीत. त्यामुळे बरेच विकसक दर कमी करीत आहेत किंवा इतर सवलती देत आहेत. फक्त मोठे विकसक या परिस्थितीत तग धरून आहेत. हा अभ्यास अहवाल 42 शहरातील 26881 विकसकांच्या 98370 प्रकल्पाचा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे. मोठ्या शहरातील परिस्थितीबरोबरच छोट्या शहरातील परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्यानी संयुक्‍तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)