घरमालक देवदर्शनाला ; नोकराने मारला 34 लाखावर डल्ला

घरमालक देवदर्शनाला ; नोकराने मारला 34 लाखावर डल्ला
पुणे,दि.12- घरमालक देवदर्शनाला गेल्याची संधी साधत नोकराने 34 लाख 50 हजारावर डल्ला मारला. यासाठी त्याला पत्नी व इतर दोन साथीदारांनी मदत केली. ही घटना बोपोडी येथील कुंदन इस्टेट येथे घडली.याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
आशिष जैन(39,रा.बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. तर नोकर मुकेश सिंग (30) ,त्याची पत्नी, केसर साई व त्यांच्या ओळखीचा सुरेंद्र सिंग यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे दिवाळीच्या सुट्टी निमीत्त कुटूंबासह देवदर्शनाला गेले होते. यावेळी त्यांच्या नोकर व त्याच्या पत्नीने इतर दोघांच्या मदतीने फिर्यादीच्या वडिलांच्या रुमचे लॉक उचकटून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील बेडरुममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील मौल्यवान वस्तू, डायमंडचे दागिने, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 34 लाख 50 हजार रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेला आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते करत आहेत.
चौकट – फिर्यादी हे बांधकाम व्यवसायीक आहेत. ते एकत्र कुटूंबासह रहातात. तर त्यांनी घरकामासाठी मुकश सिंगला कुटूंबासह बंगल्याच्या आवारात सर्व्हंट क्‍यॉर्टरमध्ये ठेवले आहे. ते दिवाळीत काही दिवसांसाठी देवदर्शनाला सहकुटूंब जाणार असल्याची माहिती आरोपीला होती. त्यानूसार त्याने त्याच्या ओळखीच्या दोघांना घरी बोलावून घेतले होते. यानंतर घरफोडी करुन आरोपी कुटूंब व साथीदारांसह पळून गेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)