घरभाडे मागितल्याने तरुणाला मारहाण

पिंपरी – तीन तरुण एकाच खोलीत राहत होते. एकत्र राहत असताना घरभाड्याची काही रक्कम थकली होती. त्यामुळे तरुणाने त्याच्या दोन साथीदारांना भाड्याचे पैसे मागितले. त्यावरून दोन तरुणांनी एकाला मारहाण केली. ही घटना 9 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास थेरगाव येथे घडली.

संदीप दत्तात्रय शिंदे (वय-26, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शरद उत्तम मोहिते (वय-25), महेश विजयकुमार भोसले (रा. दगडू पाटील नगर, थेरगाव. मूळ रा. मसा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप आणि आरोपी शरद व महेश हे तिघेजण दगडू पाटील नगर, वहिनी साहेब कॉलनी, थेरगाव येथे एकाच भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यावेळी त्यांचे खोलीचे 2 हजार रुपये भाडे थकले होते. ते भाडे संदीप यांनी आरोपींना मगितले असता त्यांनी आरोपींनी मआमच्याकडे पैसे नाहीत. तुला काय करायचे ते करफ असे म्हणत शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तर शरद मोहिते याने संदीपच्या डोक्‍यात दगड मारून त्याला जखमी केले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)