पुणे- बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून घरात प्रवेश करत 48 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तामिळनाडू येथील एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
श्रीनिवासनकुमार व्यंकटेशकुमार (वय 22, रा. लोणी काळभोर. मुळ. तामिळनाडू) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शिलवाकुमार आणि सत्वीलकुमार (दोघांचे पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रदीप रामचंद्र देवकाते (वय 46, रा. वडगांवशेरी) यांनी फिर्याद दिली. 3 मे रोजी ही घटना घडली.
देवकाते हे त्यांच्या पत्नीसह शिरूर येथे सासूरवाडीला गेले होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप बनावट चावीने उघढून घरात प्रवेश केला. लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा चंदीची भांडी आणि रोख रक्कम असा एवूैन 48 हजार 500 रुपयांचा माल लंपाक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी व्यंकटेशकुमार याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी, गुन्ह्यातील ऐवज जप्त करण्यासाठी, त्याचा इतर कोणी साथीदार आहे का?, अशा स्वरूपाचे इतर गुन्हे केले आहेत का? याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यंनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)