घरफोडी चोरीतील 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

नगर – कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारे दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून या घटनेची अधिक माहिती अशी कि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती नुसार जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा , अपर पोलीस अधिक्षक घनश्‍याम पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मोबाईलच्या तांत्रिक तपासाव्दारे घरफोडी करणारे दोन आरोपी हे सिडको औरंगाबाद येथे असल्याच्या माहितीव्दारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक सुधीर पाटील पोलीस हेड कॉन्सटेबल भाऊसाहेब काळे ,फकिर शेख, रविंद्र कर्डीले, संदीप घोडके, दिपक शिंदे, रविकिरण सोनटक्क, मेघराज कोल्हे, संदीप घोडके, दत्ता गव्हाणे, विजय ठोंबरे, मनोज गोसावी, नवगिरे, सचिन आडबल, बबन बेरड, यांनी औरंगाबाद येथील सिडको येथे जावून आरोपी रहीम नूर शेख (रा.चिस्तीया चौकीच्या मागे सिडको,औरंगाबाद ), अन्वर इसाक खान (रा.केसर कॉलनी ,औरंगाबाद ) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून ओपो कंपनीचा मोबाईल हस्तगत केला आहे. आरोपींवर कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींकडून आणखीही काही घरफोडीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्‍यता पोलीस सुत्रांकडून व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)