घरफोडी करुन साडेचार लाख लुटले

पुणे – फ्लॅटच्या दरवाज्याचे कुलुप तोडून एकाच मजल्यावरील तीन वेगवेगळ्या फ्लटॅमधुन सोन्याचे दागीने व रोख रक्‍कम असा एकुण साडेचार लाखाचा ऐवज चोरल्याची घटना फुरसुंगी परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश लांभाते (54, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, 21 मार्च रोजी दुपारच्या सुमारास साईसदन तसेच श्रीनाथ पॅलेस, तुकाई दर्शन लेक्‍सिकन स्कुलच्या समोर, फुरसुंगी येथे ही घटना घडली. एकाच मजल्यावरील तीन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी यावेळेस डल्ला मारला.

फिर्यादी यांच्या फ्लॅटमधील रोख रक्कम व सोन्याचे दागीने मिळुन एकुण 2 लाख 56 हजार 650 रुपये, तर फिर्यादी यांच्या शेजारी राहणारे अतुल कपटकर (34, साईसदन सोसायटी) यांच्या फ्लॅटमधील 1 लाख 200 रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने तर रोहन पाठक (31, श्रीनाथ पॅलेस) यांच्या घरातील 72 हजार किंमतीचे सोन्याचे दागीने असा मिळुन एकुण तीन फ्लॅटमधील 4 लाख 30 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. या प्रकरणाचा अधीक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)