घरफोडी करणाऱ्या सराईताला अटक

पिंपरी – शहरात घडफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी पाच गुन्हे उघड झाले असून 2 लाख 47 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

शुभम शिवानंद स्वामी (वय-19, रा. वडवळ नागनाथ, ता. चाकूर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून त्याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे तपास पथक आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाला एक संशयित तरुण रघुनंदन पेट्रोल पंपाच्या शेजारी उभा असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने वाकड, थेरगाव आणि काळेवाडी परिसरात चोऱ्या केल्याचे कबूल केले. शुभम वाकड, थेरगाव आणि काळेवाडी परिसरात पायी फिरून बंद असलेल्या घरांची टेहळणी करायचा. घर बंद असल्याचे निश्‍चित झाल्यास तो घरात घुसून चोरी करत असे. यावेळी पोलिसांनी घरफोडीतील शुभम कडून 80.5 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, एक मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 47 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.

त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या तपासातून वाकड पोलीस ठाण्यातील घरफोडीचे पाच गुन्हे उघड झाले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी अन्वर मोमीन, बिभीषण कन्हेरकर, धनराज किरनाळे, दादा पवार, हनुमंत राजगे, अशोक दुधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, महंमद गौस नदाफ, राजेंद्र बारशिंगे, भैरोबा यादव, गणेश गिरीगोसावी, शाम बाबा, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, सागर सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)