घरफोडी करणाऱ्या चोरटयांनी धुमाकुळ घातल्याचा प्रकार

पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या चोरटयांनी धुमाकुळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्वेनगर भागातील गंगालहरी सोसायटीतील एक सदनिका फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला तसेच या सोसायटीतील आणखी तीन रहिवाशांच्या सदनिकांची कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे.

विकास इंगळहळीकर (71 ,रा. गंगालहरी सोसायटी, कर्वेनगर) यांनी यासंदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळहळीकर यांची भाची मीरा भाटवडेकर कर्वेनगर भागातील गंगालहरी सोसायटीत राहायला आहे. चोरट्यांनी भाटवडेकर यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला तसेच या सोसायटीतील रहिवासी रवींद्र नाटेकर (67 ), अजित बोरगे (42 ), मिलींद चौबळ (58 ) यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या सदनिकेतून नेमका किती ऐवज चोरीला गेला, हे समजू शकले नाही.

-Ads-

पोलीस उपनिरीक्षक पंकज शिनगारे तपास करत आहेत. तसेच कात्रज भागातील योगअमृत सोसायटीतील रहिवासी नवीन पवार (30 ) यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून एलईडी संच, रोकड आणि सोन्याचे दागिने असा दीड लाखांचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पवार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. चिवडशेट्टी तपास करत आहेत.

डहाणूकर कॉलनीत सहा लाखाची घरफोडी

डहाणूकर कॉलनीत अमेय अपार्टमेंटमधील सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी 6 लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. संगीता बोरकर (40 )यांनी यासंदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोरकर सदनिका बंद करून कामानिमित्त बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. देशमुख तपास करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)