घरफोडी करणारा सीसीटीव्हीमध्ये कैद; पुनावळे येथील घटना

पिंपरी- पुनवळे येथे भरदिवसा घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील 9 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरणारा चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या चोराला शोधणसाठी वोकड पोलिसांनी “सीसीटीव्ही फुटेज’ “व्हायरल’ केले आहे.
पुनवळे येथील राम मंदिराजवळील गगनगिरी सदन येथे गुरुवारी (दि. 6) दुपारी दिड ते सायंकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. वैभव गोरक्षनाथ वाघ (वय 31, रा. गगनगिरी सदन, राम मंदिराजवळ पुनवळे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव वाघ गुरुवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद होते. दुपारी दीडच्या सुमारास वाघ घराबाहेर पडले. एका अज्ञात चोरट्याने सफाईदारपणे येऊन घराचा कोयंडा तोडला. घरातील कपाटाचे लॉक उघडून कपाटात ठेवलेले 382 ग्रॅम सोन्याचे तर 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले. सायंकाळी साडेसात वाजता वाघ घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. मात्र, चोरी करणारा चोरटा सोसायटी आणि परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. जे. गोडे तपास करीत आहेत.संबंधीत चोराने परिसराची आधी रेकी केली व परिसरात कुलुप बंद असेल्या घराचे कुलुप तोडून त्याने ही चोरी केली. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही बसवून घ्यावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)