घरफोडी आणि चोरीत दीड लाखाचा मुद्देमाल गडप

नगर शहर व ग्रामीण भागात चोरांची हातसफाई

नगर – नगर शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडी आणि चोरींमध्ये चोरांनी सुमारे 1 लाख 51 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प व नगर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

नवनागापूर गावठाण येथील पोपट संसारे यांच्या घरातून चोरांनी 59 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरांनी घरात स्वयंपाक रुममधून प्रवेश केला होता. दरवाजी कडी आणि कोयंडा तोडून चोर घरात घुसले होते. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, असा ऐवज चोरून नेला आहे.

नगर-औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी येथे सागर पटेकर यांच्या घरातून चोरांनी 26 हजार रोख आणि दागिने चोरून नेले आहेत. घराच्या मागील खोलीची कडी खिडकीतून हात घालून चोरांनी उघडली. घरात प्रवेश केल्यावर उचकापाचक केली. घरातून रोख रक्कम आणि सोन्याची दागिने चोरून नेली. तोफखाना पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्याची घरफोडी म्हणून नोंद के ली आहे.

निमगाव वाघा येथील चौरे मळ्यात दोन ठिकाणी घरफोडी झाली आहे. सदाशिव कापसे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी घरातून सिलिंडरची टाकी आणि रोख रक्कम, असा एकूण 36 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. एमआयडीसी आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकींची चोरी झाली आहे. शरद तोडमल (रा. जेऊर बसस्थानक, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. जेऊर बसस्थानकावरील चहाच्या दुकानात तोडमल बसले असताना त्यांची हॉटेलसमोरील सुमारे 20 हजारांची दुचाकी चोरांनी चोरून नेली.

जिल्हा न्यायालय परिसरातून दुचाकीची चोरी

जिल्हा न्यायालयात काही कामानिमित्त आलेल्या यशवंत कॉलनी येथील रश्‍मी शर्मा (वय 21) यांची दुचाकी चोरीला गेली. शर्मा यांनी दुचाकी जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या वकिलांच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. चोरांनी ती चोरून नेली. या दुकाची किंमतसुमारे 20 हजार रुपये एवढी आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)