घरफोडीप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

पुणे – दाराची कडी तोडून घरात प्रवेश करीत 51 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी दोघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजेश राम पपुल (30, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) आणि गणेश मारुती काटेवाडे (30, रा. कात्रज-कोंढवा रोड) अशी कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश सुधाकर साबणकर (38, रा. राजेश्री कॉलनी, वडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबणकर व त्यांची पत्नी 5 ऑक्‍टोबर रोजी बाहेर गेले होते. त्यामुळे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपींनी दाराचा कडी कोयंडा कापून घरात प्रवेश करीत 51 हजार रुपयांचा ऐवज चोरला. पोलिसांनी त्यातील 50 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिल संजय दीक्षित यांनी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)